• Download App
    Fadnavis: Reveal Illegal Immigrants Data, Search Operation मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले

    Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांची राज्यातील माहिती जाहीर करणार; शोधमोहीम सुरू

    Chief Minister Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Chief Minister Fadnavis  महाराष्ट्रात बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांची संकलित केलेली माहिती सरकार लवकरच सर्वांसमोर ठेवणार आहे. अशा लोकांना शोधण्याची आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू असल्याने, सरकार जाणूनबुजून ही माहिती सार्वजनिक करत नाही, अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.Chief Minister Fadnavis

    पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या प्रत्येक परदेशी नागरिकाचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढले जात आहे. ही कारवाई अतिशय वेगाने होत आहे. यामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांचाही समावेश आहे. कोणत्याही परदेशी नागरिकाला महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहू देणार नाही, असेही ते म्हणाले.



    मिठी नदी घोटाळ्यात विशेष मोडस ऑपरेंडी असल्याचा दावा

    मिठी नदी घोटाळ्याबाबत आमदार प्रसाद लाड यांनी एका विशेष प्रकारची मोडस ऑपरेंडीबद्दल मला माहिती दिली आहे. मी ही माहिती मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला देण्यास त्यांना सांगितले आहे, असे सांगत अभिनेता डिनो मोरिया, आदित्य ठाकरेंचे नाव न घेता फडणवीस म्हणाले की, मोडस ऑपरेंडीची माहिती खरी असेल, तर मिठी नदी स्वच्छ करण्याच्या नावाखाली अनेक वर्षांपासून जनतेच्या कराच्या पैशांची चोरी होत असल्याचे सिद्ध होते.

    Fadnavis: Reveal Illegal Immigrants Data, Search Operation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ranvir Shorey : अमराठी दुकानदाराला मारहाण, राक्षस मोकाट फिरत आहेत म्हणत रणवीर शौरीचा मनसेवर संताप

    ठाकरे बंधूंच्या ऐक्याला महायुतीच्या नेत्यांचा भरपूर मुद्द्यांचा इंधन पुरवठा; महाविकास आघाडीचा होणार साफ सुपडा!!

    Amit Shah : श्रीमंत बाजीराव पेशवे स्वतःसाठी नाही तर देशासाठी लढले, अमित शहा यांचे गौरवोद्गार