प्रतिनिधी
नागपूर : द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा? साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती !; अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या शरद पवारांवर आज पलटवार केला.Fadnavis retaliates against Pawar by giving evidence of Mahabharata
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. काल दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपने शब्द मोडून विश्वास घात केला नसता तर मी राजकारणातही राहिलो नसतो एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले असते, असे उद्गार काढले होते. त्यावर मग खरंच करायचे होते ना शिवसैनिकाला मुख्यमंत्री…!! सुभाष देसाई, दिवाकर रावते किंवा एकनाथ शिंदे या शिवसैनिकांना मुख्यमंत्री केले असते तर मानले असते, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले होते.
त्यावर शरद पवारांनी मी स्वतः हात धरून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर बसविले. ते तयार नव्हते. त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते, असे वक्तव्य पिंपरी-चिंचवडमध्ये केले. देवेंद्र फडणवीस यांना मी हात जोडून विनंती करतो त्यांनी असे आरोप करू नयेत, अशी पुस्ती पवारांनी जोडली होती.
पवारांच्या या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून पलटवार केला आहे. महाभारतात सुईच्या टोकावर मावेल एवढी ही जमीन द्यायला कोणी तयार नव्हते म्हणून महाभारताचे युद्ध घडले आणि इथे कलियुगात तयार नसलेल्या त्यांचा हात धरून राज्यकारभारावर बसवलेय. साहेब, असे सांगणे म्हणजे किती भाबडेपणा? बूँद से गयी वह हौद से नही आती, अशा खोचक शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर पलटवार केला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणी केला यावर आता मोठ्या प्रमाणावर वाद होताना दिसतो आहे.
Fadnavis retaliates against Pawar by giving evidence of Mahabharata
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे, बारामती, कोल्हापूर, जयपूरसह ७० ठिकाणी छाप्यांमध्ये सापडलेली बेहिशेबी मालमत्ता १८४ कोटींची!!
- चंद्रकांत पाटलांची मोठी ऑफर ; म्हणाले – राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांना पराभूत करा अन् सोन्याचा मुकुट मिळवा
- जी २३ नेत्यांना सोनिया सुनावत असताना #यह दिल मांगे राहुल #YehDilMangeRahul जोरदार ट्विटरवर ट्रेंड
- नवाब मलिक यांचा पुन्हा एनसीबीवर वार, एकापाठोपाठ ट्विट करत समीर वानखेडेंना घेरले, म्हणाले – फ्लेचर पटेल कोण हे NCBने सांगावं!