• Download App
    आतातरी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, हायकोर्टाच्या निर्णयाचं फडणवीसांनी केलं स्वागत । Fadnavis Press Conference demands Resignation Of Home Minister Deshmukh, Crticizes Thackeray Govt After HC orter CBI Probe

    ‘…आतातरी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’, हायकोर्टाच्या निर्णयाचं फडणवीसांनी केलं स्वागत

    Fadnavis Press Conference : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंती अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केल्यानं अवघ्या देशात खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी याप्रकरणी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. गृहंमत्री अनिल देशमुख यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. Fadnavis Press Conference demands Resignation Of Home Minister Deshmukh After HC order CBI Probe


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंती अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केल्यानं अवघ्या देशात खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी याप्रकरणी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. गृहंमत्री अनिल देशमुख यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

    गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा

    पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आतातरी राजीनामा द्यायला पाहिजे. चौकशीनंतर जर ते निष्पक्ष आढळले तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावे. परंतु आता नैतिकतेच्या आधारे त्यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना हटवले पाहिजे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक प्रतिमेला कलंकित करणारा हा सर्व प्रकार आहे. सीबीआय चौकशीद्वारेच सर्व सत्य समोर येऊ शकेल.

    मुख्यमंत्र्यांचे मौन का?

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले की, राज्यात एवढे गंभीर प्रकार घडत असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावर चकार शब्दही काढला नाही. त्यांनी विधानसभेत एक प्रकारे आरोपी सचिन वाझेंचा बचावच करण्याचा प्रयत्न केला. ही सर्वात आश्चर्याची बाब आहे. मग गप्प राहून या सर्व प्रकारांना मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद द्यायचा आहे का, हा आमचा सवाल आहे. या सर्व प्रकारणाचे सर्व ऑपरेटर्स आणि हँडलर्स हे सरकारमध्ये बसले आहेत. यातील राजकीय हस्तक्षेप जोपर्यंत बाहेर येणार नाही, तोपर्यंत सत्य समोर नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा ही शरद पवार आणि सरकारचीही नैतिक जबाबदारी असल्याचा पुनरुच्चारही फडणवीसांनी केला.

    लॉकडाऊन लावताना उपाययोजना केल्याच नाहीत

    लॉकडाऊनबाबतही फडणवीस म्हणाले की, केसेस वाढताहेत हे खरे आहे, यासाठी लॉकडाऊन किंवा आंशिक लॉकडाऊनची गरज आहे हे खरंय. पण हा विचार करताना सरकारने इतर बाबींकडे कानाडोळा केलाय. लॉकडाऊनमुळे छोट्या व्यावसायिकांवर मोठी गदा आली आहे. सरकारने यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. हॉटेलवाल्यांकडून मागच्या तीन महिन्यांत वसूल केलेला जीएसटी द्यावा, किंवा कामगारांना पगार देण्यासाठी काही सोय करावी, बंद पडणारे उद्योगांना यांना प्रत्यक्ष मदत करता येत नसेल तर करमाफीच्या रूपाने अप्रत्यक्ष तरी मदत करावी.

    Fadnavis Press Conference demands Resignation Of Home Minister Deshmukh After HC order CBI Probe

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!