प्रतिनिधी
नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून, तर शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतरही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक शीतयुद्ध बघायला मिळत आहे. Fadnavis-Patole’s secret meeting What was discussed for 15 minutes, Patole’s entry into BJP begins
दरम्यान सोमवारी भंडाऱ्यात नियोजन समितीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि नाना पटोले यांनी बंद दाराआड १५ मिनिटे चर्चा झाली. या गुप्त बैठकीनंतर सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात नियोजन समितीची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री फडणवीस यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, आ. परिणय फुके, आ. नरेंद्र भोंडेकर, आ. राजू कारेमोरे आणि खा. सुनील मेंढे यांच्यासह अधिकारी आणि जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या सभेनंतर कुणालाही कळायच्या आत नाना पटोले जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या कक्षात पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्या कक्षात पोहोचले.
फडणवीस आणि पटोले राजकारणात दोघेही एकमेकांचे विरोधक असले तरी खासगी आयुष्यात ते चांगले मित्र असल्याची कुजबूजही या निमित्ताने सुरू होती. साकोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी अतिरिक्त निधी मागितला असावा का? राज्यातील राजकीय चाणक्य म्हणून नवीन ओळख निर्माण करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपचे दिल्लीतील नेतेही खुश असल्याने भविष्यात नाना पटोले भाजपत प्रवेश तर करणार नाही ना? अशा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
Fadnavis-Patole’s secret meeting What was discussed for 15 minutes, Patole’s entry into BJP begins
महत्वाच्या बातम्या
- संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात प्रथमच एव्हरेस्ट वीरांगना संतोष यादव यांच्या रूपाने प्रथमच महिला प्रमुख पाहुण्या सहभागी!!
- शिवसेना विरुद्ध शिवसेना : आज मुंबईत पहिले शक्तीप्रदर्शन, ठाकरे आणि शिंदे गटाचा वेगळा दसरा मेळावा
- दोन्हीकडून बाळासाहेब ब्रँडच मोठा होणार असेल, तर महाराष्ट्रातल्या इतर ब्रँडचे होणार काय??
- दसरा मेळावे : गर्दी खेचण्याच्या स्पर्धेत कोणाला यशस्वी?, ठाकरे की शिंदे?; पोलिसांनी केला सर्व्हे!