Monday, 12 May 2025
  • Download App
    पंकजा मुंडें यांनी दसरा मेळाव्यात भाजप नेत्यांवर केलेल्या विधानावर प्रश्न विचारताच फडणवीस पत्रकार परिषद सोडून निघून गेले? | Fadnavis left the press conference, When asked about the statement made by Pankaja Munde on BJP leaders at Dussehra rally

    पंकजा मुंडें यांनी दसरा मेळाव्यात भाजप नेत्यांवर केलेल्या विधानावर प्रश्न विचारताच फडणवीस पत्रकार परिषद सोडून निघून गेले?

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कालच बीड येथील दसरा मेळाव्यामध्ये बोलताना पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्ष गटावर सणकून टीका केली होती. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकमेकांना खूश करण्याच्या ऐवजी जनतेच्या हिताची कामे करावीत असे त्या बोलल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी भाजपच्या नेत्यांना घरचा आहेरही दिला होता. त्या म्हणाल्या होत्या की, विरोधकांनी आता सरकार पाडण्याचे मुहूर्त जाहीर करत बसण्याऐवजी विरोधकाच्या भूमिकेत जाऊन थोडे जनहिताचे काम करावे. पंकजा मुंडे यांनी पक्षाला दिलेला हा घरचा आहेर या विषयावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.

    Fadnavis left the press conference, When asked about the statement made by Pankaja Munde on BJP leaders at Dussehra rally

    पुढे त्या असेही म्हणाल्या होत्या, मी घरात बसले म्हणून जे लोक खुश होतात, त्यांनी लिहून घ्या की इथून पुढे मी दौरे करणार आहे. दिल्लीपासून नाशिकपर्यंत ते उसाच्या फडामध्ये जाऊन मी कामगारांशी संवाद साधणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर त्यांनी जोरदार निशाणा साधला पण पंकजा मुंडे यांच्या वक्त्याबद्दल त्यांना जेव्हा त्यांना विचारण्यात आले तेव्हा फडणवीस काहीही न बोलता पत्रकार परिषदेतून निघून गेले.


    Gender equality in warfare; भारतीय सैन्य दलात स्त्रीशक्तीचे वाढते योगदान; संरक्षण खात्याकडून महत्त्वाची पावले


    दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते की, मुख्यमंत्र्यांनी भाबडेपणाचा मुखवटा आता उतरवला पाहिजे. मुख्यमंत्रिपदाची त्यांची महत्त्वाकांक्षा होती, ती त्यांनी पूर्ण केली. आता त्याला तत्त्वज्ञानाची जोड दिली तर बरे होईल असा टोमणा त्यांनी लगावला होता. यावरही न थांबता ते पुढे म्हणाले, शिवसेना प्रमुखांनी जर दिलेला शब्द पाळला असता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे ह्यांपैकी एक कोणतरी मुख्यमंत्री पदावर बसले असते. आणि जर ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणे यांना पक्षातून का बाहेर काढलं? हा प्रश्नदेखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी विचारला होता.

    Fadnavis left the press conference, When asked about the statement made by Pankaja Munde on BJP leaders at Dussehra rally

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!