विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत एकूण 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती प्रकिया सुरू झाली आहे. पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. परीक्षार्थी विद्यार्थी चाचणीसाठी मैदानात पोहोचले आहेत. चाचण्या सुरु झाल्या पण यामध्ये पावसाचा व्यत्यय येऊ लागला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांच्या व्यवस्थित अकॉमोडेशनच्या सोयी करा, अशा सूचना दिल्या आहेत. Fadnavis instructions to police units
राज्याच्या कानाकोपऱ्यातील उमेदवार विद्यार्थी पोलीस भरतीच्या ठिकाणी पोहोचत आहेत. पावसामुळे त्यांच्या राहण्याची अडचण होत आहे. तसेच पावसामुळे पोलीस भरतीवेळी उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांची माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले :
पाऊस आहे त्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यापुढेही पावसाचे दिवस आहेत. त्यानंतर पुढे आचारसंहिता सुरु होईल. अशावेळी पोलीस भरतीची मैदानी चाचणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न राहील. कारण अनेक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असते. त्यांना ती संधी मिळायला हवी. यामुळे पाऊस असलेल्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
ज्या युनिट्समध्ये पाऊस नाही तिथे चाचण्या होत आहेत, तसेच पोलीस भरतीच्या चाचणीसाठी उमेदवार दूरवरुन येतात. राहण्याची जागा नसल्याने ही मुले आपल्याला बस स्टॅण्डवर वैगेरे दिसत आहेत. त्यांच्यासाठी जवळच कुठे मंगल कार्यालय अशा ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन आम्ही भरती प्रक्रिया राबवणाऱ्या युनिट्सना केले आहे.
Fadnavis instructions to police units
महत्वाच्या बातम्या
- योग दिन 2024: भारतासह जगभरात योग दिवस साजरा करण्यास सुरुवात!
- सभासद शेतीच्या कामात व्यस्त, महाराष्ट्रात 8305 सहकारी संस्थांची निवडणूक लांबणीवर!!
- पंतप्रधान मोदींनी श्रीनगरमध्ये केला योगाभ्यास; म्हणाले, आता जगाचे…
- योगाने जग व्यापले, अमेरिकेतही योग दिनाचा उत्साह; न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये हजारो लोकांनी केला योगा