प्रतिनिधी
मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने पराभवाच्या भीतीने माघार घेतली, असा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. काही जणांनी पोटनिवडणुकीतून माघार घेण्यासाठी भाजपला मागच्या दाराने विनंती केली होती, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे, तर शरद पवारांनी मात्र काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण भाजपला विनंती केली नव्हती, तर पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सूचना केली होती, असा खुलासा केला आहे. Fadnavis exploding the secret of some people’s backward request for BJP’s withdrawal
अंधेरीच्या पोटनिवडणुकीतील माघारीच्या मुद्द्यावर लळीत सुरूच आहे. सुषमा अंधारे, जयंत पाटील, संजय राऊत यांनी भाजपने पराभवाच्या भीतीने माघार घेतल्यास आरोप केला आहे. हा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळून लावला आहे, पण त्या पलिकडे जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होणे शक्यच नव्हते.
आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांनी भाजपच 1 नंबर असल्याचे आधीच दाखवून दिले आहे. त्यामुळे पराभवाची भीती आमच्याकडे नव्हती. ती कुणाकडे होती, हे तुम्हीच शोधा, असा टोला त्यांनी लगावला आहे. पण त्याचवेळी त्यांनी फडणवीस यांनी पोटनिवडणुकीतील माघारी साठी काही जणांनी भाजपला मागच्या दाराने विनंती केली होती असा गौप्यस्फोट केला आहे.
मात्र शरद पवारांनी आज या संदर्भात वेगळा खुलासा केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीनुसार पोटनिवडणुकीत निधन झालेल्या लोकप्रतिनिधीचा घरातील कोणी उभे राहत असेल तर निवडणूक बिनविरोध करावी, अशी माझी सूचना होती. ती विनंती नव्हती, असे शरद पवार म्हणाले आहेत.
Fadnavis exploding the secret of some people’s backward request for BJP’s withdrawal
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारची दिवाळी भेट : आज पीएम किसान सन्मान निधीचे 16000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा!!
- संभाजीनगर + नाशिकच्या कंपन्यांमधील 1060 जागांसाठी आजपासून रोजगार मेळावा; व्हा ऑनलाईन सहभागी
- अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध??; महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या “अशाही” आठवणी!
- राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर : साम्य काय??, भेद काय??