• Download App
    सुनेत्रा पवारांना दिलेले मत जाईल मोदींना, तर सुप्रिया सुळेंना दिलेले मत जाईल राहुल गांधींना; फडणवीसांचा पवारांवर पलटवार!! Fadnavis counter attack on Pawar

    सुनेत्रा पवारांना दिलेले मत जाईल मोदींना, तर सुप्रिया सुळेंना दिलेले मत जाईल राहुल गांधींना; फडणवीसांचा पवारांवर पलटवार!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बारामतीत सुनेत्रा पवारांना दिलेले मत जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदींना, तर सुप्रिया सुळे यांना दिलेले मत जाईल राहुल गांधींना, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर पलटवार केला. Fadnavis counter attack on Pawar

    बारामतीची लोकसभेची लढाई ही सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी नाहीत ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरच्या भाजपच्या मेळाव्यात केले होते फडणवीस यांच्या त्या वक्तव्यावर शरद पवारांनी जोरदार टीकास्त्र सोडले होते बारामतीत भाजपने पवार कुटुंब फोडले आणि पवार कुटुंबामध्येच लोकसभेची लढाई लावून दिली असे टीकास्त्र पवारांनी सोडले होते यासंदर्भात आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारल्यानंतर फडणवीसांनी आपल्या जुन्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला.

    बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या दोन उमेदवारांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार असली तरी प्रत्यक्षात ती लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातच आहे कारण सुनेत्रा पवारांना दिलेले मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जाईल त्या लोकसभेत मोदींच्या बाजूनेच उभ्या राहतील त्या उलट सुप्रिया सुळे निवडून आल्या तर त्या लोकसभेत राहुल गांधींच्या बाजूने उभ्या राहतील हेच मी म्हणालो होतो आणि आजही तेच म्हणतो पण कुणाला समजूनच घ्यायचे नसेल तर त्याला काही करू शकत नाही, असा टोला फडणवीस यांनी शरद पवारांना हाणला.

    बारामतीतली लढाई मोदीविरुद्ध राहुल अशी करण्यात फडणवीस यांची चतुराई दिसली. संपूर्ण देशभरात भाजप ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्यातच आहे, असे नॅरेटिव्ह तयार करत आहे. “इंडिया” आघाडीने पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला नसला, तरी राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रा संपूर्ण भारतात फिरून स्वतःभोवतीच केंद्रित केली होती. त्यामुळे आपोआपच काँग्रेस कडून त्यांचेच नाव पुढे येईल, अशी राजकीय व्यवस्था काँग्रेसने केली आहे.

    या पार्श्वभूमीवर भाजपने 2024 ची लढाई मोदी विरुद्ध राहुल अशीच समोर आणली आहे. त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणून बारामती सारख्या हायप्रोफाईल मतदार संघात फडणवीस यांनी केवळ पवार कुटुंबातील लढाई न ठेवता ती मोदी विरुद्ध राहुल अशी करून शरद पवारांची कुचंबणा केली आहे.

    Fadnavis counter attack on Pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस