• Download App
    Fadanavis Pendrive Bomb : सरकारी वकील प्रवीण चव्हाण "गायब"!!; तर त्यांची सुरक्षा वाढविण्याची आशिष शेलार यांची मागणी|Fadanavis Pendrive Bomb: Public Prosecutor Praveen Chavan "Disappears" !!; Ashish Shelar's demand to increase their security

    Fadanavis Pendrive Bomb : सरकारी वकील प्रवीण चव्हाण “गायब”!!; तर त्यांची सुरक्षा वाढविण्याची आशिष शेलार यांची मागणी

    प्रतिनिधी

    पुणे : भाजपच्या अनेक नेत्यांना विविध प्रकरणांमध्ये अडकवण्या संदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर पहिल्यांदाच या मुद्द्यावर प्रतिक्रिया देणारे सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण आज मात्र दिवसभर “गायब” झाले आहेत. प्रवीण चव्हाण हे महाविकास आघाडीच्या महा कत्तलखान्याचे मास्टर माईंड असल्याने त्यांची सुरक्षा देखील वाढवावी, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.Fadanavis Pendrive Bomb: Public Prosecutor Praveen Chavan “Disappears” !!; Ashish Shelar’s demand to increase their security

    विविध प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रवीण चव्हाण यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात येते. प्रवीण पंडीत चव्‍हाण हे पुण्यामध्ये शरद पवार यांचे निवासस्थान 1 मोदीबाग सोसायटी जवळच हिरवाई बिल्डिंगमध्ये राहतात.



    आज सकाळी जेव्हा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालय आणि निवासस्थानावर गेले तेव्हा दोन्ही ठिकाणी त्यांना कुलपे आढळली. त्यांना मोबाईलवरून संपर्क केला तेव्हा ते नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात आले. आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधींनी ही बातमी दिली आहे.

    देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर प्रवीण चव्हाण यांनी काल पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना संबंधित व्हिडिओ आणि ऑडिओ मॉर्फ्ड असल्याचे सांगितले होते. या फुटेजची फॉरेन्सिक लॅबरोटरी कडून तपासणी करून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र काल ही प्रतिक्रिया दिल्यानंतर आज सकाळपासून प्रवीण चव्हाण नेमके कुठे आहेत हे मात्र कोणाला समजले नाही.

    या पार्श्वभूमीवर प्रवीण चव्हाण यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. प्रवीण चव्हाण हे सरकारी वकील आणि या संपूर्ण प्रकरणातले मास्टर माईंड आहेत. त्यांच्याकडे नेमके कोण भेटायला येते?, कोणत्या उद्देशाने येते?, या संदर्भात राज्य सरकारने लक्ष ठेवावे तसेच त्यांची सुरक्षा व्यवस्था देखील वाढवावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले पुरावे अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामध्ये अनेक संवेदनशील प्रकरणांचे धागेदोरे आहेत. त्यामुळे प्रवीण चव्हाण यांची सुरक्षा व्यवस्था ही फार महत्त्वाचे आहे. त्यांच्याकडे नेमके कोण येते जाते?,याची निश्चित नोंद ठेवली पाहिजे, असे अशिष शेलार म्हणाले.

    एक मोदीबाग जवळ निवासस्थान

    शरद पवार यांचे पुण्यातील निवासस्थान 1 मोतीबाग याच्या जवळच असलेल्या हिरवाई बिल्डिंगमध्ये प्रवीण चव्हाण यांचे निवासस्थान आहे. त्यांच्याकडे केसस असलेले अनेक आशील आज दिवसभर त्यांच्याकडे येऊन गेले. परंतु दरवाजा बंद असल्याने त्यांना परत जावे लागले, असे बातम्यांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

    Fadanavis Pendrive Bomb: Public Prosecutor Praveen Chavan “Disappears” !!; Ashish Shelar’s demand to increase their security

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा