• Download App
    महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २५ तारखेपासून व्यापक लसीकरण मोहीम ; उदय सामंत यांची घोषणा, दिल्या आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना Extensive vaccination campaign for college students from 25th; Uday Samant's announcement, instructions to take necessary measures

    महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २५ तारखेपासून व्यापक लसीकरण मोहीम ; उदय सामंत यांची घोषणा, दिल्या आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे.Extensive vaccination campaign for college students from 25th; Uday Samant’s announcement, instructions to take necessary measures


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोविड -१९ महामारीमुळे मागील अनेक दिवस महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू होती, परंतु आता कोरोनाच सावट कमी झाल्याने ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत.मुंबईच्या सिडनॅहम महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उदय सामंत बोलत होते.



    त्यावेळी सामंत म्हणाले की, कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस झालेले विद्यार्थी ऑफलाईन उपस्थित राहू शकणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.या मोहिमेतून प्रत्येक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लस उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

    आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना

    १) ज्या विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांनी ही सामाजिक अंतर राखून, मास्क लावून वर्गात उपस्थिती लावावी.
    २)महाविद्यालयांनीही विद्यार्थी-पालक यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा.
    ३)विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ४)ऑनलाईन – ऑफलाईन परीक्षा
    ५)कोरोनानंतरच्या काळातील नोकरीच्या संधी

    अशा विविध विषयांवर उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थी सुरक्षिततेची काय तयारी महाविद्यालयांनी केली आहे याची पाहणी त्यांनी केली आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

    Extensive vaccination campaign for college students from 25th; Uday Samant’s announcement, instructions to take necessary measures

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!