कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या पदांसाठी निवडणूक लढविण्याच्या संधीपासुन वंचित राहावे लागू नये यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेनंतर काढण्यात येईल. Extension of time for submission of caste validity certificate to candidates for Municipal, Municipal Council elections, decision in Cabinet meeting
वृत्तसंस्था
मुंबई : कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या पदांसाठी निवडणूक लढविण्याच्या संधीपासुन वंचित राहावे लागू नये यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेनंतर काढण्यात येईल.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्याकरीता राखीव असलेल्या जागेसाठी निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नामनिर्देशन पत्राबरोबर, सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे करण्याची तरतूद आहे.
तथापि, जात पडताळणी समित्यांकडील कामाच्या भारामुळे केवळ वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे, उमेदवारांना राखीव पदांसाठी निवडणूक लढविण्याच्या संधीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी उपरोक्त सर्व अधिनियमांत यापूर्वीच सुधारणा करुन महानगरपालिका/नगरपरिषदांच्या सार्वत्रिक/ पोटनिवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र भरताना संबंधित उमेदवारांना वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची 12 महिन्यांची मुदत हमीपत्रावर देणे अशी तरतूद करण्यात आली होती.
Extension of time for submission of caste validity certificate to candidates for Municipal, Municipal Council elections, decision in Cabinet meeting
महत्त्वाच्या बातम्या
- काल संजय राऊत – सुप्रिया सुळेंचा नाच गाजला; आज शशी थरुर यांचा फोटो गाजतोय!!
- ओमिक्रॉनचा धोका : सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, लस असूनही कोरोना चाचणी अनिवार्य
- IB Alert : संसदेला घेराव आणि खलिस्तानी झेंडा फडकवण्याचा कट, पोलीस-गुप्तचर यंत्रणा सतर्क
- जम्मू-काश्मिरात निरपराध नागरिकांच्या हत्या करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
- यूपी सरकारला “बैल” म्हणून घेतलेत; पण योगींच्या बुलडोझरची भीती अखिलेशना का वाटते??
- धक्कादायक! सामान्यांना लसीकरणाची सक्ती-मुंबईत मात्र १ लाख फ्रंटलाईन वर्कर्सचेच लसीकरण नाही …