प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेत 236 वार्ड करण्याचा निर्णय ठाकरे पवार सरकारने घेतला होता, तो बदलून शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा मुंबईत 227 वार्ड केले. मात्र नवी मुंबई महापालिकेत भौगोलिक विस्तार करत ठाणे तालुक्यातील 14 गावांचा समावेश केला आहे. Extension of limits of Navi Mumbai Municipal Corporation
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगरविकास विभागाने त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जारी केली आहे. नवी मुंबई महापालिकेची हद्दवाढ केल्यानंतर ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामाली, नारीवली, बाळे, नागाव, भंडाली, उत्तरशिव आणि गोटेघर या १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी
राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी २०२१ ते मे २०२२ कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याची कार्यवाही सुरू आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर कार्यक्रमानुसार या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूका झाल्या आणि त्यानंतर हद्दवाढीची कार्यवाही झाल्यास ग्रामपंचायतींचे अस्तित्व संपुष्टात येईल. नव्याने स्थापित नागरी प्राधिकरणांच्या निवडणूका घ्याव्या लागतील परिणामी निवडणूकीवर दुहेरी खर्च होईल.
या बाबी विचारात घेता ठाणे तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांना पत्र पाठविले आहे.
Extension of limits of Navi Mumbai Municipal Corporation
महत्वाच्या बातम्या
- गोगरा हॉटस्प्रिंगमधून अखेर भारत-चिनी सैन्य परतले : स्टँडऑफ पॉइंटवरील बंकर उद्ध्वस्त, पोस्ट रिकाम्या केल्या
- विश्व हिंदू परिषद : ज्ञानवापी मंदिर मुक्तीतील पहिला अडथळा पार; निर्णय समाधानजनक!!
- व्होकल फॉर लोकल, जीडीपी पलिकडची विकेंद्रीत अर्थव्यवस्था यासाठी संघ कटीबद्ध!!
- लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास भरपाई; शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय