• Download App
    भोसरी ते जुन्नरपर्यंत पीएमपी चा मार्ग वाढवा ; आमदार महेश लांडगे यांची मागणी the PMP route from Bhosari to Junnar; Demand of MLA Mahesh Landage

    भोसरी ते जुन्नरपर्यंत पीएमपी चा मार्ग वाढवा ; आमदार महेश लांडगे यांची मागणी

    भोसरी हे ठिकाणाहून अनेक प्रवासी जुन्नर याठिकाणी जाण्यास उपलब्ध असतात. त्यामुळे आपल्या बसचे आर्थिक नुकसानही होणार नाही.Extend the PMP route from Bhosari to Junnar; Demand of MLA Mahesh Landage


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : भोसरी ते जुन्नर या मार्गावर पुणे महानगर परिवहन महामंडळाचे पीएमपीनवीन बस सेवा सुरु करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबद्दल त्यांनी पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी नारायण मिश्रा यांना निवेदन दिले आहे.

    या निवेदनात आमदार लांडगे यांनी म्हटले आहे की, पुणे जिल्हात स्वराज्याचे प्रतिक असलेला शिवनेरी किल्ला जुन्नरमध्ये आहे.पुणे शहरातून अनेक पर्यटक शिवनेरी किल्ल्याला मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.



    तसेच पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नागरिक व महिला हे मंचर, जुन्नर व आंबेगाव या ठिकाणी नोकरी निमित्त ये-जा करतात. या मार्गावर खाजगी वाहनातून प्रवास करणे महिलांना व विद्यार्थ्यांना जोखमीचे असून प्रवास करते वेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

    पुढे आमदार महेश लांडगे म्हणाले की , सध्या आपल्या विभागामार्फत मंचर पर्यंतच बससेवा उपलब्ध असून,पुढील प्रवास करताना इतर खाजगी वाहनां मधून प्रवास करावा लागतो. भोसरी हे ठिकाणाहून अनेक प्रवासी जुन्नर याठिकाणी जाण्यास उपलब्ध असतात. त्यामुळे आपल्या बसचे आर्थिक नुकसानही होणार नाही. किल्ले शिवनेरी पायथ्यापर्यंत लवकरात लवकर यामार्गावर तात्काळ बससेवा सुरु करावी अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

    Extend the PMP route from Bhosari to Junnar; Demand of MLA Mahesh Landage

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना