• Download App
    कोकणाकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे, मालगाड्या रद्द; ठाणे आणि दिव्या दरम्यान अखेरचा जम्बो मेगाब्लॉक । Express train to Konkan, freight canceled; Last jumbo megablock between Thane and Divya

    कोकणाकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे, मालगाड्या रद्द; ठाणे आणि दिव्या दरम्यान अखेरचा जम्बो मेगाब्लॉक

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोकणाकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे, मालगाड्या रद्द केल्या आहेत. ठाणे आणि दिव्या दरम्यान अखेरचा जम्बो मेगाब्लॉक मार्गीकेच्या कामासाठी केला आहे. त्यामुळे रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. Express train to Konkan, freight canceled; Last jumbo megablock between Thane and Divya

    ठाणे आणि दिव्या दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेसाठी रेल्वेकडून युद्ध पातळीवर काम सुरु आहे. हा मेगाब्लॉक ३ दिवसांचा ७२ तासांचा शेवटचा सगळ्यात मोठा जम्बो मेगाब्लॉक असणार आहे. या जम्बो मेगाब्लॉकमध्ये ठाणे ते दिवा दरम्यान असलेल्या जलद मार्गिकेवर काम केले जाणार आहे. हा जम्बो मेगाब्लॉक ५ फेब्रुवारी मध्यरात्री १२ वाजता सुरु होऊन ७ तारखेच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत असा ७२ तास सुरु राहणार आहे.



    विशेष करून कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून येणाऱ्या मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही मेल गाड्या या पनवेलवरून धावणार आहेत. या जम्बो मेगाब्लॉक दरम्यान प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित महापालिकांना विशेष बस सेवा सुरु करण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या ब्लॉक दरम्यान अनेक मेल गाड्या या रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.

    Express train to Konkan, freight canceled; Last jumbo megablock between Thane and Divya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस