नाशिक : अजितदादांच्या दादागिरीवर महेश दादाच भारी पिंपरी चिंचवड मध्ये मारली बाजी!!, असे चित्र महापालिका निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर घेतलेल्या एक्झिट पोल मधून समोर आले. पवारांच्या सकाळ वृत्त समूहाची मालकी असलेल्या साम टीव्हीने घेतलेल्या एक्झिट पोल मध्ये पिंपरी चिंचवड मध्ये भाजपला 70 तर दोन्ही राष्ट्रवादींना मिळून 49 जागा मिळतील. उद्धव ठाकरेंची शिवसेना 2, तर मनसे 2 जागांवर थांबतील असे त्यात नमूद केले आहे.
याचा अर्थच आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर मात केल्याचे चित्र सामच्या एक्झिट पण बघून पुढे आले आहे.
– पवार काका -:पुतण्या एकत्र, तरीही…
महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुका सुरू असताना अजित पवारांनी आणि शरद पवारांनी फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांवरच लक्ष केंद्रित केले होते. अजित पवारांच्या संपूर्ण परिवाराने पिंपरी चिंचवड मध्ये मुक्काम ठोकला होता. अजितदादांनी पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या गल्लीबोळात जाऊन प्रचार केला. एकेकाळी या दोन्ही महापालिकांवर पवार काका – पुतण्यांची एकहाती सत्ता होती. पण 2017 मध्ये भाजपने ही सत्ता उधळून लावली होती.
त्यानंतर 2026 मध्ये आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पवार काका आणि पुतण्या एकत्र आले त्यांनी दोन्ही राष्ट्रवादींचे एकच पॅनल तयार केले आणि ते दोन्ही महापालिकांच्या निवडणुकींना एकत्रित सामोरे गेले.
अजित पवार महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी अजित पवारांनी महायुतीचे राजकीय पथ्य पाळले नाही आपण स्वतंत्र निवडणुका लढवत असलो तरी आपण एकमेकांवर टीका करायची नाही असे भाजप शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे ठरले होते त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणे टाळले होते. परंतु, अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये ते पथ्य पाळले नाही. उलट त्यांनी भाजपलाच भ्रष्टाचारी पक्ष ठरविले होते. त्यांनी पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांतदादा पाटील यांना, तर पिंपरी चिंचवड मध्ये आमदार महेश लांडगे यांना वैयक्तिक रित्या टार्गेट केले होते.
– अजितदादांची दादागिरी फेटाळली
परंतु पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या मतदारांनी अजित पवारांची दादागिरी फेटाळून लावल्याचे चित्र सामने घेतलेले एक्झिट पोल मधून समोर आले. पिंपरी चिंचवड मध्ये आमदार महेश लांडगे यांचीच दादागिरी अजित पवारांच्या बारामतीच्या दादागिरीवर भारी पडली. कारण महेश लांडगे यांनी ही निवडणूक पिंपरी चिंचवडच्या स्वाभिमानाचा विषय केला बारामतीतून पिंपरी चिंचवड मध्ये येऊन दादागिरी करणाऱ्या दादाला घालवा. आपले स्थानिक नेतृत्व मोठे करा, या प्रचारावर महेश लांडगे यांनी भर दिला होता. महेश लांडगे यांच्या आक्रमक नेतृत्वाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभक्कम “बळ” दिले होते त्याचाच परिणाम एक्झिट पोल मधून समोर आला. आपल्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांना पराभवाला सामोरे जावे लागले मावळमध्ये त्यांचा मुलगा पार्थ पवारचा पराभव झालाच होता. त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागू शकते असे चित्र एक्झिट पोल मधून समोर आले.