• Download App
    कोकणातील महापुरामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा लांबणीवर, आता १२ ऑगस्टला होणार परीक्षा। Exam will postponed once again

    कोकणातील महापुरामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा लांबणीवर, आता १२ ऑगस्टला होणार परीक्षा

    मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून राज्यभरात ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय परिषदेने‍ घेतला आहे. त्यामुळे आता ९ ऑगस्ट रोजी होणारी ही परीक्षा आता १२ ऑगस्टला घेण्यात येणार आहे. Exam will postponed once again



    कोकणातील अनेक नद्यांना महापूर येऊन गेलेला आहे. असंख्य घरेच्या घरे पाण्याखाली बुडाली होती. मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली आहे. मुलांकडे अभ्यासाचेही साहित्य राहिलेले नाही. शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेली अनेक मुले अजूनही चिखलगाळाने भरलेली घरे साफ करण्यात गुंतलेली आहेत. त्यामुळे ९ ऑगस्ट रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेने लावून धरली होती. त्यात काही भागात अजूनही कोरोना आहे. अर्थात ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी कोरोना हे कारण नसून महापूर हेच कारण असल्याचे मानले जाते.

    Exam will postponed once again

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bhujbal : आता सामंजस्यबद्दल बोलणारे पवार तेव्हा बैठकीला का आले नाहीत?, भुजबळांचा पलटवार

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप