• Download App
    पवारांपाठोपाठ ठाकरेंचे देखील ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात; माजी खासदार शिवाजी कांबळे परत शिवसेनेत!! Ex shivsena MP shivaji kamble returned to uddhav thackeray shivsena from BJP

    पवारांपाठोपाठ ठाकरेंचे देखील ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात; माजी खासदार शिवाजी कांबळे परत शिवसेनेत!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी आपल्या वाट्याला आलेले 10 लोकसभा मतदारसंघ लढवण्यासाठी “तगडे: उमेदवार मिळेनात म्हणून शरद पवारांनी जसे ताटातले वाटीत, वाटीतले ताटात असाच प्रकार करून आपले जुनेच अनुयायी आपल्या गोटात आणले, तसाच प्रकारचा उद्धव ठाकरेंनी उस्मानाबाद मध्ये केला. शिवसेनेचे भाजपमध्ये गेलेले माजी खासदार शिवाजी कांबळे यांना उद्धव ठाकरेंनी परत एकदा आपल्या शिवसेनेत प्रवेश दिला. Ex shivsena MP shivaji kamble returned to uddhav thackeray shivsena from BJP

    शरद पवारांनी आपलेच जुने अनुयायी विजयसिंह मोहिते पाटील तसेच रामराजे निंबाळकर यांचे कुटुंबीय उत्तम जानकर अभिनेत्यांना आपल्या गोटात आणले. धैर्यशील मोहिते पाटलांना माढातून तिकीट देऊन लोकसभेच्या मैदानात उतरवले, तसाच प्रकार ठाकरेंनी केला.

    धाराशिवचे भाजपाचे नेते आणि माजी खासदार शिवाजी कांबळे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवाजी कांबळे दोन वेळा मूळ शिवसेनेचे खासदार होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या प्रदेश कमिटीत ते पदाधिकारी होते.

    शिवाजी कांबळे यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून 1996 आणि 1999 साली लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. दोन्ही वेळा ते शिवसेनेत होते. त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली. परंतु काँग्रेस उमेदवार अरविंद कांबळे यांच्याकडून ते पराभूत झाले. त्यानंतर ते शिवसेना सोडून भाजपत गेले होते. आता पुन्हा ते स्वगृही जात आहेत.

    तीन लोकसभा लढवल्या, दोनमध्ये विजय

    1996 – विजयी 15,919

    शिवाजी कांबळे = शिवसेना = 1,98, 521 मते

    अरविंद कांबळे = काँग्रेस = 1,82,602

    1999 – विजयी – 59,073

    शिवाजी कांबळे = शिवसेना = 2,52,135

    कानिफनाथ देवकुळे = राष्ट्रवादी = 1,93,062

    1998 = पराभूत = 47,018 मतांनी

    अरविंद कांबळे – काँग्रेस = 2,80,592

    शिवाजी कांबळे = शिवसेना = 2,33,574

    Ex shivsena MP shivaji kamble returned to uddhav thackeray shivsena from BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस