• Download App
    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल, 6 पोलिसांसह एकूण 7 जणांविरुद्ध FIR । Ex-Mumbai top cop Param Bir Singh, 7 others booked for extortion

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल, 6 पोलिसांसह एकूण 7 जणांविरुद्ध FIR

    Param Bir Singh : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. परमबीर सिंग यांच्याशिवाय इतर 7 जणांविरोधातही पोलिसांनी एफआयआर नोंदविला आहे. ज्यामध्ये 2 नागरिक आणि 6 पोलिसांचा समावेश आहे. या पोलिसांमध्ये मुंबई गुन्हे शाखेचे डीसीपी अकबर पठाण यांचे नावही आहे. Ex-Mumbai top cop Param Bir Singh, 7 others booked for extortion


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. परमबीर सिंग यांच्याशिवाय इतर 7 जणांविरोधातही पोलिसांनी एफआयआर नोंदविला आहे. ज्यामध्ये 2 नागरिक आणि 6 पोलिसांचा समावेश आहे. या पोलिसांमध्ये मुंबई गुन्हे शाखेचे डीसीपी अकबर पठाण यांचे नावही आहे.

    मुंबई पोलिसांनी दोन नागरिकांनाही अटक केली आहे, सुनील जैन आणि पुनमिया अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविला आहे.

    परमबीरसिंग यांना 24 लाखांचा दंड

    2015 ते 2018 पर्यंत बदली झाल्यानंतरही मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना सरकारी निवासस्थानाचा वापर केल्याबद्दल परमबीर सिंग यांच्यावर 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ठाणे पोलिस आयुक्त असताना परमबीर हे दोन सरकारी निवासस्थाने वापरत होते.

    2018 पर्यंत परमबीरसिंग यांना 54 लाख 10 हजार 545 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता, त्यापैकी त्यांनी 29 लाख 43 हजार दिले आहेत, परंतु अद्याप 24 लाख 66 हजार बाकी आहेत. परबीरसिंग त्यावेळी मलबार हिलमधील नीलिमा अपार्टमेंटमध्ये राहत होते.

    सूत्रांच्या माहितीनुसार, 24 लाख रुपयांचा हा दंड त्यांचे वेतन किंवा सेवानिवृत्तीच्या नंतर मिळणाऱ्या पैशांतून वसूल केला जाऊ शकतो. परमबीर सध्या होमगार्ड्सचे डीजी आहेत.

    अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे केले होते आरोप

    परमबीर सिंग यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपानंतर वाद वाढला. काही दिवसानंतर अनिल देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.

    अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर राज्य सरकारकडून अनेक चौकश्यांचा सामोरे लागले आहे, असा आरोप करत परमबीर सिंग यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासह या खटल्यांची सुनावणी महाराष्ट्राबाहेर करावी व सीबीआयसारख्या स्वतंत्र एजन्सीमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.

    Ex-Mumbai top cop Param Bir Singh, 7 others booked for extortion

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र