काँग्रेसचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे बंधू श्रीधर कलमाडी यांच्या बाणेर येथील सदनिकेवर डल्ला मारून चोरट्यांनी 72 लाख 93 हजार ऐवज पळवून नेला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे बंधू श्रीधर कलमाडी यांच्या बाणेर येथील सदनिकेवर डल्ला मारून चोरट्यांनी 72 लाख 93 हजार 777 ‘रुपयांचा ऐवज चोरी केला. Ex MP Suresh Kalmadi Brother Shridhar Kalmadi house broken by Thieves
याप्रकरणी श्रीधर शामराव कलमाडी (वय.74,रा.बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध चतुःश्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी रात्री सायंकाळी सहा ते सात्री साडे दहाच्या सुमारास बाणेर रोड शामलाली सर्व्हे नंबर सहा फ्लॅट क्रमांक 39,40,48 या सदनिकेत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे काँग्रेेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे बंधू असून, त्यांचे साई सर्व्हिस नावाने गाडी विक्रीचे शोरुम आहे. तसेच इतरही व्यवसाय आहेत. रविवारी रात्री फिर्यादी व त्यांच्या पत्नी घर बंद करून त्यांच्या नातेवाईकांकडे जेवणासाठी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घराच्या खिडकीची जाळी फाडून त्यातून हात घालून दरवाज्याची कडी काढली. त्यानंतर खिडकीतून घरात प्रवेश करून बेडरुमधील कपाटात ठेवलेली 50 हजारांची रोकड व हिरे, मोती जडीत दागिणे असा किंमती ऐवज चोरी केला. फिर्यादी हे घरी परतले तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळगावे करीत आहेत.
Ex MP Suresh Kalmadi Brother Shridhar Kalmadi house broken by Thieves
महत्त्वाच्या बातम्या
- मालगाडी थेट पार्किंगमध्ये घुसली; हरियाणातील धक्कादायक घटना; काळजाचा ठोका चुकवला
- Hijab Ban : हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही, शाळांमध्येही हिजाब बंदी योग्यच; कर्नाटक हायकोर्टाचा निर्वाळा!!
- HC Rejected Nawab Mailk Petition : नवाब मलिकांची ईडी अटक कायदेशीरच; मालिकांची याचिका हायकोर्टाने फेटाळली!!
- PM Modi On Dynasty : तिकीट कापले तर माझी जिम्मेदार माझी, पण भाजपमध्ये घराणेशाही चालणार नाही; पंतप्रधान मोदींचा खासदारांना कडक संदेश!!