• Download App
    माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा चकित करणारा आरोप, म्हणाले- गृहमंत्री अमित शहा सॅटेलाइट वापरून ईव्हीएम हॅक करतात|Ex-MP Chandrakant Khaire's Shocking Allegation, Said- Home Minister Amit Shah Hacks EVMs Using Satellite

    माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा चकित करणारा आरोप, म्हणाले- गृहमंत्री अमित शहा सॅटेलाइट वापरून ईव्हीएम हॅक करतात

    प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : ईव्हीएम वरून अनेकदा विरोधकांनी आरोप केले आहेत. तथापि, एकदाही हे आरोप सिद्ध होऊ शकलेले नाहीत. आता ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी असाच एक खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी ईव्हीएम हॅक होत असल्याचा जाहीर आरोप केला आहे.Ex-MP Chandrakant Khaire’s Shocking Allegation, Said- Home Minister Amit Shah Hacks EVMs Using Satellite

    चंद्रकांत खैरे म्हणाले की, भाजपला देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत. गृहमंत्री अमित शहा हे सॅटेलाइट नियंत्रित करून भाजपसाठी ईव्हीएम हॅक करतात. त्यांनी या कामासाठी माणसे ठेवली असून त्यातीलच एकाने मला ही गोपनीय माहिती दिली आहे. ते शिवगर्जना अभियानाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत होते.



    खैरे म्हणाले की, इतर प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठी भाजप ईडी, सीबीआय, आयकर विभाग, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यांसारख्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर करत आहे.

    शिंदे गटाला धनुष्यबाण पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव देण्याच्या निर्णयाबाबत खैरे म्हणाले, निवडणूक आयोगाने केंद्राच्या दबावात येऊन काम केले. ईव्हीएमला आमचा विरोध आहे. यापुढील सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवरच व्हाव्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

    Ex-MP Chandrakant Khaire’s Shocking Allegation, Said- Home Minister Amit Shah Hacks EVMs Using Satellite

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!