विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : जगात सर्व मोह असावेत पण संपत्तीचा मोह नसावा असे कोणीतरी कुठेतरी म्हटलेले आहे. नुकताच कोल्हापूरमध्ये एक घटना घडली आहे. संपत्तीच्या वादावरून आपल्या चुलत भावावर गोळ्या झाडण्याचा प्रकार घडला आहे. आणि ही घटना एका माजी राज्यमंत्र्यांच्या नातवाकडून झालेली आहे.
Ex-minister’s grandson quarrels over property dispute, one brother fires at another
माजी कृषीमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे नातू अभिषेक आणि मानसिंग यांच्यामध्ये हा वाद निर्माण झाला होता. अभिषेक हा श्रीपत बोंद्रे यांचा मुलगा सुभाष बोंद्रे यांचा मुलगा तर मानसिंग हा श्रीपत बोंद्रे यांचा मुलगा विजय बोंद्रे यांचा मुलगा. हे दोघेही रंकाळा तलावाच्या भागामध्ये स्वतंत्र राहत होते.
पण श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि जमिनीच्या कारणावरून या दोघांमध्ये बरेच वाद होते. सोमवारी रात्री साडेबारा वाजता मानसिंग बोंद्रे यांनी अभिषेक याच्या घराजवळ जाऊन ‘तुला व तुझ्या खानदानाच्या संपवतो, तुझा गेम करतो’ अशी धमकी देत रिव्हॉल्व्हर काढले. आणि त्यातून चार गोळ्या देखील फायर केल्या. याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर या घटनेला तोंड फुटले. या प्रकरणी मानसिंग यांच्याविरोधात अभिषेक बोंद्रे यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काळे या घटनेचा तपास करत आहेत. यादरम्यान मानसिंग बोंद्रे हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Ex-minister’s grandson quarrels over property dispute, one brother fires at another
महत्त्वाच्या बातम्या
- MISS UNIVERSE : मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूच्या यशात महाराष्ट्राचा वाटा ! ट्रान्सजेंडर साईशा शिंदेची कमाल…
- मोठी बातमी : सहा महिन्यांत लहान मुलांसाठी येणार ‘कोव्हॉवॅक्स’ लस, सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख पूनावाला यांची घोषणा
- नव्या वर्षात नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनचे रेट कमी झाले तर ऍमेझॉन प्राइमचे वाढले, जाणून घ्या काय आहेत नवे प्लॅन्स
- संजय राऊतांवरचा एफआयआर मागे घेण्यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांची फौज पोहोचली दिल्लीच्या पोलिस आयुक्तांकडे!!