• Download App
    जरंडेश्वर साखर कारखाना गैरव्यवहाराचे पुरावे पाच वर्षांपूर्वीच ईडीकडे सोपविले : राजू शेट्टी यांचा दावा ; जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गैरव्यवहार। Evidence of Jarandeshwar Sugar Factory malpractice was handed over to ED five years ago

    WATCH : जरंडेश्वर गैरव्यवहाराचे पुरावे पाच वर्षांपूर्वीच ईडीकडे दिले होते; राजू शेट्टी यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहाराचे पुरावे मी केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) पाच वर्षांपूर्वी सोपविले होते, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. Evidence of Jarandeshwar Sugar Factory malpractice was handed over to ED five years ago

    कर्जात बुडालेले सहकारी साखर कारखाने प्रथम अवसायनात काढायचे. मग ते स्वतःच खरेदी करायचे, असे उद्योग राज्यात सुरु होते. दोन दिवसात कवडीमोल किमतीला विकल्या गेलेल्या कारखान्यात ईडीने लक्ष घातल्याबाबत शेट्टी पुढे म्हणाले, आतापर्यत असे ४२ कारखाने लिलावात काढले गेले आहेत. ३ हजार कोटी रुपयांचे कारखाने शेकड्यामध्ये खरेदी केले आहेत. ३०० एकरची जमीन १६ लाखांत दाखविली. महाराष्ट्राच्या पैशाची ही लूट आहे.

    गेल्या काही वर्षापासून याबाबत आम्ही पाठपुरावा करतोय. मात्र आधीच्या सरकारने लक्ष घातले नाही. आताच सरकार ही लक्ष घालत नाही. फडणवीस यांनी हे प्रकरण हसून घालवले २०१६ मध्ये ईडीच्या दिल्ली कार्यलयात याबाबत पुरावे दिले होते. विकलेल्या
    ४२ कारखान्यात सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. चंद्रकांत पाटील यांच्या पत्रव्यवहारानंतर कारवाई झाल्याचे समजते.

    • हे सर्व पक्षीय चोर आहेत
    • मी कोणाला सॅटिफिकेट द्यायला आलो नाही
    • राजकीय हेतूने कारवाई केली जात आहे
    • पाच वर्षे ईडी झोपली होती का ?
    • तपास यंत्रणांचा राजकीय वापर होतोय
    • चंद्रकांत पाटील यांनी इतर कारखान्याबाबत पत्र लिहावे
    • आर्थिक देवाण घेवाण झाल्यानंतर प्रकरण मिटेल
    • पण शेतकऱ्यांचे पैसे मिळालेच पाहिजेत

    Evidence of Jarandeshwar Sugar Factory malpractice was handed over to ED five years ago

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील