विशेष प्रतिनिधी
पुणे : आंबेगाव तालुक्यातील अनेकांनी माझ्यासोबत काम केलं आहे. अनेकांनी प्रामाणिकपणे काम केलं, ते हयात नाहीत. पण निष्ठा ही त्यांचे वैशिष्ट्य होतं, पण आज काय पाहतो आपण? त्यांना आम्ही सगळं दिलं. विधानसभा, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, साखर कारखान्याचे राष्ट्रीय अध्यक्ष पद दिलं. मात्र, त्यांनी 5 टक्केही निष्ठा पाळली नाही, ते निघून गेले. असे लोक नागरिकांशीसुद्धा निष्ठा पाळणार नाहीत. त्यांना धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे, असे आवाहन शरद पवार यांनी आंबेगाव मतदार संघातील लोकांना केले. तर त्यांनी दिलीप वळसे पाटलांना टोला लगावला.Even those who gave everything were not loyal; Sharad Pawar’s detours targeted
शरद पवार यांची मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघात सभा पार पडली. यावेळी पवार यांनी दिलीप वळसे पाटलांना आगामी काळात पराभूत करण्यासाठी कामाला लागण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.
शरद पवार म्हणाले की, पुढील दोन महिने आम्ही पिंजून काढू. निष्ठवंतांना निवडून आणू, तुम्हीही निष्ठवंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, हीच अपेक्षा मी व्यक्त करतो, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह दोन्ही अजित पवारांना मिळाल्यावर पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.
पवार पुढे म्हणाले, बऱ्याच दिवसांनी जाहीर सभेच्या निमित्ताने आज मी तुमच्या समोर आलो आहे. आज वेगळा काळ आहे, देशात वेगळं चित्र आहे. शेतीशी इमान राखणारे आज तुम्ही सगळे समोर आहात. देशात कुठं ही गेलो तरी पाहतो, काळ्या मातीशी इमाने इतबारे असणारा शेतकरी संकटात आहे. तो घाम गाळतो, पण पिकाला रास्त भाव मिळेना. असं घडलं की शेतकरी कर्जबाजारी होतो. अशावेळी सावकार आणि बँका घरातील वस्तूही नेतात. सन्मानाने जगणाऱ्या शेतकऱ्यांवर हे अस्मानी संकट आहे.
ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक जाहिरात आहे. मोदींची गॅरंटी, कोणाची गॅरंटी तर मोदींची, काय गॅरंटी तर शेतीला भाव, तुमच्या मुलाला नोकरी, वगैरे वगैरे अशी गॅरंटी देतात. एकीकडे ही गॅरंटी अन दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांनीही अजित पवार गटाचा समावेश घेत वळसे पाटलांवर निशाणा साधला.
Even those who gave everything were not loyal; Sharad Pawar’s detours targeted
महत्वाच्या बातम्या
- संत फिंत म्हणून आधी जरांगेकडून तुकाराम महाराजांचा अपमान, नंतर माफी; जवळच्या मित्रावरही शरसंधान!!
- पवारांचा नवा पक्ष वाढवण्यासाठी नवा फॉर्म्यूला; आधीचा पक्ष फोडणाऱ्यांचीच घरे फोडा!!
- रविशंकर प्रसाद यांचे ममता बॅनर्जींवर जोरदार टीकास्त्र, म्हणाले…
- पाकिस्तानकडे उरले फक्त ३० दिवस, तब्बल तीन अब्ज डॉलर्सचे कर्जही थकले!