प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्र गेले काही दिवस राजकीय गदारोळ सुरू असताना उद्धव ठाकरे यांचे मंत्रिमंडळ प्रत्यक्ष कामच करत होते. मंत्रालयातील कामात खंड नव्हता. त्यातही राष्ट्रवादीचे मंत्री जास्त ऍक्टिव्ह होते. याच्या बातम्या मराठी प्रसार माध्यमांनी दिल्याच आहेत. तब्बल 208 जी. आर. 1170 कोटींची कामे घाईगर्दीने मंजूर वगैरे बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या होत्या. या घाईगर्दीने मंजूर केलेल्या कामांसंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोशियारी या ठाकरे – पवार सरकारकडे विचारणा केली, अशा बातम्याही आल्या. Even in the last two days, the NCP’s financial support – nutrition
पण एवढे करूनही ठाकरे – पवार सरकारमधील मंत्र्यांची कार्यक्षमता आणि काम करण्याचा “वेग” थांबला नाही. अखेरच्या दोन दिवसात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 1690 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आणि त्यापैकी 1293 कोटी रुपये हे पुणे जिल्ह्यातल्या कामांसाठी आहेत, अशी बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
या कामांचे तपशील देखील या बातमीत स्पष्ट उल्लेखित आहेत. जेजुरी गड तीर्थक्षेत्र योजनेसाठी 349 कोटी रुपये, तर वढू येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी 269 रुपये कोटी रुपये मंजूर केले आहेत. पुणे जिल्ह्यातील नगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायत साठी 675 कोटी रुपयांची कामे मंजूर केले आहे, असेही या बातमीत आवर्जून नमूद केले आहे.
Even in the last two days, the NCP’s financial support – nutrition
महत्वाच्या बातम्या
- बारामतीच्या चाणक्यांची उभी केलेली महाविकास आघाडी कोसळली; अमित मालवीय यांची खोचक टीका
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद : मुदत, ना पवार कधी पूर्ण करू शकले, ना ठाकरे करू शकले!!
- सत्तांतराचे इंगित : राष्ट्रवादीच्या निधी खेचण्यातच शिवसेना आमदारांची होरपळ आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचीही परवड!!
- ठाकरे – पवार सरकार कोसळले : शेवटच्या भाषणातही बंडखोरांवरच कटाक्ष!!; उद्धव ठाकरेंचे भाषण जसेच्या तसे!!