प्रतिनिधी
पुणे : लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुण्यात आगमन झाले असताना एकीकडे भाजपच्या नेत्यांनी अतिशय जल्लोष त्यांचे स्वागत केले, तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट, आम आदमी पार्टी आणि पुरोगाम्यांनी त्यांचा निषेध करत जोरदार आंदोलन चालविले. Even if Pawar had not come to the program, the Tilak Award program would not have made a difference
या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे एक खोचक वक्तव्य व्हायरल झाले आहे. शरद पवार हे लोकमान्य टिळक पुरस्कार कार्यक्रमाला आले नसते, तरी काही फरक पडला नसता. कार्यक्रम जसा भव्य दिव्य व्हायचा तसा झालाच असता, असा टोला विखे पाटलांनी शरद पवारांना लगावला आहे.
त्याचबरोबर मोदी आणि पवार एकत्र येणार म्हणून ठाकरेंच्या पोटात दुखणारच, असा टोलाही विखे पाटलांनी लगावला. सध्या पवार आणि ठाकरे यांच्याकडे फक्त स्वतःचे कुटुंबच उरले आहे. त्यांचे पक्ष एनडीए आघाडीत निघून आले आहेत, असे शरसंधान विखे पाटलांनी साधले.
शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टिळक पुरस्कार कार्यक्रमात जाऊ नये यासाठी विरोधकांनी जंग जंग पछाडले तरी देखील पवार कार्यक्रमाला जात आहेत. या पार्श्वभूमीवर पवारांचे कट्टर विरोधक असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचे पवार कार्यक्रमाला आले नसते तरी काही फरक पडला नसता, हे वक्तव्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या जोरदार व्हायरल झाले आहे.
Even if Pawar had not come to the program, the Tilak Award program would not have made a difference
महत्वाच्या बातम्या
- समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना! शहापूर येथे गर्डरसह क्रेन कोसळल्याने १५ कामगारांचा मृत्यू
- Lok Sabha Elections 2024 : पंतप्रधान मोदींनी ‘NDA’ खासदारांना लोकसभा निवडणुकीसाठी दिला कानमंत्र!
- 2015 मधले भाकीत 2023 मध्ये ठरले खरे; देशातले सर्वांत मोठे राजकीय हवामान तज्ञ आज मोदींबरोबर व्यासपीठावर!!
- Land For Job Scam प्रकरणात ‘ED’चा लालूंना दणका, सहा कोटींची मालमत्ता जप्त!