मराठीतील आद्य लेखिका काशीबाई कानिटकरांचे वैशिष्ट्य Even before independence, literature voices about injustice to womenSpeciality of early lady author Kashibai Kanitkar
विशेष प्रतिनिधी
पुणे : आधुनिक मराठी साहित्यातील आद्य लेखिका काशीबाई कानिटकर यांचा जन्मदिन. कादंबरी,चरित्र,कथा या साहित्य प्रकाराचे लेखन करणाऱ्या त्या पहिल्या महिला. काशीबाई कानिटकर यांचा जन्म २० जानेवारी इ.स. १८६१ सांगलीच्या अष्टे गावात झाला. मृत्यू इ.स. १९४८ मध्ये झाला.
‘मनोरंजन’ आणि ‘निबंधचंद्रिका’ नियतकालिकात त्यांनी सुरुवातीला लेखन केले. ‘शेवट तर गोड झाला’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. काशीबाईंचा जन्म महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील अष्टे गावी झाला. न्यायालयीन पेशात असलेल्या व स्वतः व्यासंगी लेखक असलेल्या गोविंद वासुदेव कानिटकरांसोबत वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. गोविंदरावांनी काशीबाईंना घरीच मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषा शिकवल्या.
काशीबाई बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवीत असत. पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चरित्र काशीबाई कानिटकर यांनी लिहिले.
काशीबाई इ.स. १९१० च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास हजर होत्या. काशीबाई कानिटकर (इ.स. १८६१ – इ.स. १९४८) या मराठी भाषेतील लेखिका व स्त्रीवादी समाजसुधारक होत्या. मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणार्या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला. आज त्यांचा जन्मदिवस. त्यांना विनम्र आदरांजली.
Even before independence, literature voices about injustice to womenSpeciality of early lady author Kashibai Kanitkar
महत्त्वाच्या बातम्या
- मुलायमसिंहांचे साडू, काँग्रेसच्या पोस्टर गर्लचा भाजपमध्ये प्रवेश, प्रमोद गुप्ता म्हणाले- अखिलेशने नेताजींना कैदेत ठेवलंय
- BJP Candidates List : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची 34 उमेदवारांची यादी जाहीर, जाणून घ्या कोणाला कुठून मिळाले तिकीट!
- ओडिशाच्या किनारपट्टीवरून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी, ३५० ते ४०० किमीपर्यंत मारक क्षमता