• Download App
    तटकरेंनी ठाकरे - पवारांना एकत्र आणूनही शिवसेनेचे तीन आमदार झुकले नाहीच!!Even after Tatkare brought Thackeray and Pawar together, three Shiv Sena MLAs did not bow down

    तटकरेंनी ठाकरे – पवारांना एकत्र आणूनही शिवसेनेचे तीन आमदार झुकले नाहीच!!

    प्रतिनिधी

    रायगड : रायगड च्या पालक मंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात बंड करून उठलेले शिवसेनेचे तीन आमदार आज खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एका कार्यक्रमात एकत्र आणून देखील बधले नाहीत. त्यांच्या पुढे झुकले नाहीत.Even after Tatkare brought Thackeray and Pawar together, three Shiv Sena MLAs did not bow down

    रायगड जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना एकत्र आणले. या कार्यक्रमात रितसर शिवसेनेचे तीन आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु, सध्या या तीनही आमदारांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांना हटवण्याच्या मागणीवर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थिती असून तसेच खुद्द शरद पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती असून देखील शिवसेनेच्या तीनही आमदारांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता.

    त्यामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात सुनील तटकरे यांनी ठाकरे – पवार यांना एकत्र आणून दाखवल्याची जेवढी चर्चा रंगली त्यापेक्षा जास्त चर्चा शिवसेना आमदारांच्या बहिष्काराची रंगली. शिवसेना आमदारांनी एक प्रकारे खासदार सुनील तटकरे यांना आपली ताकद दाखवून दिली.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जरी ऑनलाइन उपस्थित असले तरी व्यासपीठावर फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते राहिले. शिवसैनिक या कार्यक्रमाकडे फिरकले देखील नाही. यातून मुख्यमंत्र्यांनी देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांना एक वेगळा “राजकीय संदेश” दिल्याचे मानण्यात येत आहे. आपण जरी कार्यक्रमाला मुख्यमंत्री म्हणून अधिकृतरीत्या उपस्थित असले तरी संघटनात्मक पातळीवर पक्षप्रमुख म्हणून शिवसेनेच्या आमदारांना अनुपस्थित राहण्याची मुभा उद्धव ठाकरे यांनी दिली होती का?, याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

    Even after Tatkare brought Thackeray and Pawar together, three Shiv Sena MLAs did not bow down

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस