• Download App
    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने! | The Focus India

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    विशेष प्रतिनिधी 

    पुणे: खराडी या उच्चभ्रू वसाहतीत चालू असलेल्या एका स्टुडीओ अपार्टमेंटमधील रेव्ह पार्टी वर २६ जुलैच्या मध्यरात्री पोलीसांनी धाड टाकली. त्या ठिकाणी पोलिसांना दारू, हुक्कापॉट आणि कोकेन सापडलं. तेव्हाच, ड्रग्ज घेतल्याप्रकरणी खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह चार पुरुष आणि दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. Eknath Khadse

    या सगळ्या प्रकरणावरून राज्यातलं वातावरण तापलेलं असतांनाच, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत एक पत्रकार परिषद घेतली. परिषदेत त्यांनी बरेच धक्कादायक खुलासे केले. ज्यात त्यांनी प्रांजल खेवलकरांच्या फोनमधल्या हिडन फोल्डरचं सत्य समोर आणलं. ज्यामध्ये विविध महिलांसोबतच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट, अश्लील व्हिडिओज आणि फोटोज असल्याचं दिसून आलं.



    परिषदेत चाकणकरांनी काय सांगितलं?

    राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रांजल खेवलकर प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासे केले. खेवलकर यांच्या फोनच्या हिडन फोल्डरमध्ये २५२ व्हिडीओज, १४९७ नग्न फोटोज सापडले. तर, ७ मुलींसोबत आक्षेपार्ह चॅटिंग केल्याचं सुद्धा आढळून आलं. यात धक्कादायक बाब, म्हणजे यातील कित्येक मुलींना केवळ सिनेमात काम करण्याचं आमिष दाखवून परराज्यातून महाराष्ट्रात आणलं आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आलं. यातील कित्येक महिलांचा जबरदस्तीने वैश्या व्यवसायासाठी देखील वापर करण्यात येत होता. यासाठी नकार देणाऱ्या मुलींना त्यांच्या अश्लील फोटोज व व्हिडीओजच्या माध्यमातून ब्लॅकमेल केलं जात होतं. Eknath Khadse

    एवढंच नाही, तर खेवलकरांच्या मोबाईमध्ये त्यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीचे देखील वाईट अवस्थेतील फोटोज दिसून आले. आणि हा प्रकार केवळ पुण्यातच घडत नव्हता, तर यापूर्वी देखील प्रांजल खेवलकरांनी गोवा, लोणावळा, जळगाव, साकीनाका अशा विविध ठिकाणी मुलींना बोलावून रेव्ह पार्टीच्या माध्यमातून त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याची माहिती समोर आलीये.

    त्यामुळे आता महिला आयोगाच्या वतीने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी पोलिस महासंचालकांना पत्र लिहिण्यात आलंय. तसंच या प्रकरणी योग्य तो तपास व्हावा, यादृष्टीने मानवी तस्करी विरोधी पथक तैनात करण्यात यावं. खेवलकरांचे मोबाईल, आर्थिक व्यवहार, मेल यांचा सखोल तपास करण्यात यावा. तसंच त्यांनी महिलांची फसवणूक कशी केली ? यामागे नेमकं कोणतं रॅकेट सक्रीय आहे?  याचा एसआयटी  मार्फत तपास व्हावा. अन दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. Eknath Khadse

    मात्र आता रुपाली चाकणकरांनी केलेल्या सगळ्या खुलास्यांनंतरही एकनाथ खडसे अजूनही आपल्या जावयाचीच बाजू घेतांना दिसतायेत. ज्या मुलींवर अन्याय झालाय, त्या मुलींनी कोणतीही तक्रार का केली नाही? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला. रुपाली चाकणकर केवळ रोहिणी खडसेंचा राजकीय बदला घेण्यासाठी हे सगळं षडयंत्र रचत आहेत, असा गंभीर आरोप देखील खडसे यांनी केला आहे.

    Even after all this, Eknath Khadse is still favoring his son in law!

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !

    Pigeons at Dadar : दादरचे कबुतरखाना प्रकरण; अन्न-पाणी देण्यावर बंदी कायम; तज्ज्ञ समितीने सखोल अभ्यास करण्याचे न्यायालयाकडून निर्देश