• Download App
    चिपळूणमधील पूरग्रस्तांना सरकारचा ठेंगा; ४० दिवस उलटूनही दिमडीचीही मदत नाही Even after 40 days flood victims of Chiplun did not get help from government

    चिपळूणमधील पूरग्रस्तांना सरकारचा ठेंगा; ४० दिवस उलटूनही दिमडीचीही मदत नाही

    वृत्तसंस्था

    चिपळूण : ‘ केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे’, या उक्तीचा ठाकरे- पवार सरकारला विसर पडला आहे. चिपळूणमधील पुराला चाळीस दिवस उलटूनही दिमडीची सरकारने मदत केली नाही, अशी व्यथा व्यवसायिकांनी मांडली. Even after 40 days flood victims of Chiplun did not get help from government

    मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्टी नदीला २२ जुलै रोजी पूर आला. अख्खं शहर पाण्याखाली गेले. १७ तास पाण्याखाली शहर राहिल्याने घरांचे नुकसान झाले. बाजारपेठेतील दुकाने पुराच्या पाण्याने उध्वस्त झाली. अनेक मंत्री महोदयांनी चिपळूणचे दौरे केले. व्यापाऱ्यांना आश्वासनेही दिली.



    मुख्यमंत्री आले, डझनभर मंत्री आले, गेले तरीही मदत मिळत नाही. नक्की मदत गेली कुठे? मदतीचा पैसा जातो कुठे? असा सवालही व्यावसायिक करत आहेत.
    आज चाळीस दिवस झाले अजूनही दुकाने तशीच आहेत. माल कसा भरायचा? घर खर्च कसा चालवायचा या विवंचनेत आहोत.विमा पॉलिसी कंपनीने तर आमची फरफट केली आहे, असे व्यावसायिक सांगत आहेत.

    धीर धरायचा तरी किती ?

    सर्व नेत्यांनी तुम्ही धीर धरा, तुम्हाला योग्य तो न्याय देऊ, मदत करु, परत तुम्हाला उभेही करु, असे म्हणत मदतही जाहीर केली. त्यातली सरकारी दमडी देखील खात्यात जमा झाली नाही, असे व्यावसायिकांनी सांगितलं. आता धीर धरायचा तरी किती ? असा सवाल त्यांनी केला आहे.

    Even after 40 days flood victims of Chiplun did not get help from government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!