वृत्तसंस्था
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्मसमभावाची नव्हे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी सांगितले. Establishment of Hindavi Swarajya by Shivaraya; BJP state president Chandrakat Patil
ते म्हणाले, शिवाजी महाराजांनी हिंदू जनमत एक केले. मावळ्यांना देव, देश आणि धर्मासाठी लढायला शिकविले. हिंदूंना संरक्षण देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
भाजपच्या हिंदुत्वाचे समर्थन करताना ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या मुक्त करून इतिहासातील चुका दुरुस्त केल्या आहेत. बाबर हा आक्रमक होता. श्री राम हे आमचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांनी अयोध्येत भव्य श्री राम मंदिर उभारण्याचा संकल्प केला. सामान्य माणसाला पोटाबरोबरच धर्मही प्रिय आहे. त्याला हरिद्वार, केदारनाथ, काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यायचे आहे. त्यासाठी जीर्णोद्धार केला आहे. तेथे जाण्यासाठी सुविधा निर्माण केल्या.
यावेळी पाटील यांनी स्वतःच्या धर्माला वाईट म्हणणाऱ्या दुसऱ्या धर्माची स्तुती करण्यात धन्यता मानणाऱ्या आणि ढोंगी धर्मनिरपेक्षवाद्यांवर जोरदार टीका केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल सुरु आहे. हिंदवी स्वराज्य स्थापन करून शिवाजी महाराजांनी राष्ट्रनिर्माणाचा पाया रचला. त्यावर कळस चढविण्याचे कार्य माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, असे ते म्हणाले.
Establishment of Hindavi Swarajya by Shivaraya; BJP state president Chandrakat Patil
महत्त्वाच्या बातम्या
- भारतात ओमीक्रोनचे १०१ रुग्ण; महाराष्ट्रात सर्वाधिक ३२ रुग्ण आढळले; दक्षता घेण्याचे केंद्राचे आवाहन
- मुलींचे लग्नाचे वय वाढवण्यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, मुस्लिम लीग आणि अन्य मुस्लिम लोकप्रतिनिधींचा विरोध!!
- ज्या लोकांनी या गैरव्यवहारामध्ये सहभाग घेतला असेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
- Asian Champions Trophy : चक दे ! भारताची पाकिस्तानवर ३-१ ने मात ; सेमीफायनलध्ये धडक ; भारत स्कोअर बोर्डवर अव्वल …