• Download App
    मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मराठी भाषा दिन उत्साहात ; विलेपार्ले शाखा वर्धापनदिन सोहळा संपन्न । Enthusiasm for Marathi Language Day at Mumbai Marathi Library; Vile Parle Branch Anniversary Celebration

    मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मराठी भाषा दिन उत्साहात ; विलेपार्ले शाखा वर्धापनदिन सोहळा संपन्न 

           विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मराठी भाषा दिन व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विलेपार्ले शाखा वर्धापन दिन सोहळा  नुकताच  प्रबोधनकार ठाकरे संकुल विलेपार्ले पार  पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे तसेच  ज्येष्ठ लेखक अरुण फडके यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे लिखित ‘देशोदेशीच्या लोककथा’ या ४ बालकथासंग्रहाचे व लता गुठे लिखित मुलांसाठी मजेदार काव्यकोडी अशा ५ पुस्तकांचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले. Enthusiasm for Marathi Language Day at Mumbai Marathi Library; Vile Parle Branch Anniversary Celebration

    याप्रसंगी अरविंद प्रभू, प्रबोधनकार ठाकरे संकुलचे सर्व व लेखक गुरुनाथ तेंडुलकर यांची विशेष उपस्थिती होती. मुं. म.ग्रंथसंग्रहालय विलेपार्लेच्या वतीने स्वरचित कथा स्पर्धेच्या  पुरस्कारांचे वितरण मंदाकिनी भट व पूजा राईलकर यांच्या हस्ते करण्यात आले. अनुक्रमे चित्रा वाघ: प्रथम पुरस्कार, उज्वला पै : द्वितीय पुरस्कार व चारुलता काळे यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

    ‘पुस्तकं माणसाला घडवतात’ या विषयावर,  ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, नगरसेविका व लेखिका  ज्योती आळवणी यांच्याशी सायली वेलणकर यांनी सुसंवाद  साधला. अध्यक्षीय भाषणात रविंद्र गावडे यांनी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे महत्त्व विषद केले. तसेच ग्रंथसंग्रहालयाचे गतवैभव नवीन कार्यकारिणी दिमाखात प्राप्त करून देईल असे आश्वासन दिले. सुधा भट व माधवी कुंटे यांच्या शाखेतील अमूल्य योगदानाबद्दल गावडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.



    या सोहळ्यास  मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कोषाध्यक्ष  जयवंत गोलतकर,कार्यवाह  उमा नाबर, नायगाव शाखा कार्यवाह अमेय कोंडविलकर तसेच विविध क्षेत्रातील  मान्यवर आणि रसिक वाचक, श्रोते  मोठ्या  संख्येने उपस्थित होते. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विलेपार्ले शाखेच्या अध्यक्षा लता गुठे यांनी कार्यक्रमाचे  आयोजन केले होते. सूत्रसंचालन  प्रशांत राऊत व सायली वेलणकर यांनी केले. निशा वर्तक यांनी आभार मानले

    Enthusiasm for Marathi Language Day at Mumbai Marathi Library; Vile Parle Branch Anniversary Celebration

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस