- अमंलबजावणी संचलनालयाने (ईडी) पुण्यातील बिटकॉईन फसवणूक प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. Enforcement directorate agency team take information of Bitcoin fraud pune cyber police station case
विशेष प्रतिनिधी
पुणे : अमंलबजावणी संचलनालयाने (ईडी) पुण्यातील बिटकॉईन फसवणूक प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची तपास यंत्रणेेने संपूर्ण माहिती घेतली. त्याच अनुषंगाने ईडी पथकाने समांतर तपास सुरु केला आहे.
पंकज प्रकाश घोडे (रा. ताडीवाला रोड,पुणे) आणि सेवानिवृत्त पोलिस अधिकारी रवींद्र प्रभाकर पाटील (रा. बिबवेवाडी,पुणे) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. त्यांना पुणे पोलिसांनी सायबर तज्ञ म्हणून कामाची जबाबदारी दिली होती.
मात्र त्यांनी शासनाची फसवणूक करत कोट्यवधी रुपयांचे बिटकोईन स्वतः च्या बँक खात्यात वळवले. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा ईडीने तपास सुरू केला आहे. ईडीचे काही अधिकारी बुधवारी पुणे पोलीस आयुक्तालयात आले होते. त्यांनी पंकज घोडे व रवींद्र पाटील यांची संपूर्ण माहिती पोलिसाकडून घेतली. दरम्यान, बिटकॉईनमधील मुख्य आरोपी अजय भारद्वाज सह भावांविरोधात दत्तवाडी व निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सवोच्च न्यायालयाने आरोपीचे डिजीटल वॉलेट निष्पन्न झाल्यावर त्याबाबतची क्रिप्टोवॉलेटची गोपनीय माहिती तपास यंत्रणांना द्यावे लागणार असा निर्णय दिला आहे.
Enforcement directorate agency team take information of Bitcoin fraud pune cyber police station case
महत्त्वाच्या बातम्या
- त्या दोघी म्हणतात आम्ही एकत्रच राहणार, पुण्यात समलिंगी तरुणींचा लिव्ह इन करार
- निरपराधांच्या नरसंहारामुळे संताप, रशियाला यूनोच्या मानवी हक्क समितीतून केले निलंबित
- चीनच्या कच्छपि लागून श्रीलंकेत आगडोंब, मानवतावादी भूमिकेतून भारताकडून पुन्हा ७५ हजार मेट्रिक टन इंधन पुरवठा, जीवनावश्यक औषधांचीही मदत
- प्रभाग रचनेचे अधिकार काढून घेणाऱ्या आणि निवडणुकीची प्रक्रिया रद्द ठरविणाऱ्या कायद्यांना सर्वोच्च आव्हान, महाविकास आघाडी सरकारने केले होते कायदे