प्रतिनिधी
मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारच्या 75000 जागांच्या भरतीला सुरवात झाली आहे. 2000 जणांना याअंतर्गत नियुक्तीपत्रे देण्यात आली. आता वर्षभरात सर्व 75000 जागा भरण्याचे नियोजन आहे. employment opportunities; Shinde-Fadnavis government will soon sign an agreement with private companies
या शिवाय राज्यातील पहिल्या कौशल्य विद्यापीठाच्या बांधकामालाही सुरूवात झाली आहे. नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा तरुणांनी नोकऱ्या देणारे बनावे असे सरकारने सांगितले आहे. यासाठी सरकारही प्रयत्न करीत आहे.
१ लाख तरुणांना रोजगाराची संधी
खासगी कंपन्यांमध्ये लवकरच 1 लाख तरुणांना रोजगाराची संधी दिली जाईल. त्यासाठी सरकार कंपन्यांशी करार करेल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पोलीस विभागात 18500 हजार जागांची भरती करू, अशी घोषणाही फडणवीसांनी केली आहे.
खासगी क्षेत्रात तरुणांना रोजगार मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच खासगी कंपन्यांशी 1 लाख रोजगारांबाबतचे करार (MOU) करून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे भरवण्यात येतील. यातून 1 लाख तरुणांना रोजगार मिळेल.
employment opportunities; Shinde-Fadnavis government will soon sign an agreement with private companies
महत्वाच्या बातम्या
- The Kerala Story : 32000 मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर आणि येमेन – सीरियात दहशतवादी गुलाम म्हणून विक्री!!
- मोदी सरकारची महाराष्ट्राला भेट : 2 लाख कोटींच्या 225 प्रकल्पांना मंजूरी; रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांची घोषणा
- वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प शिंदे – फडणवीस सरकारच्या नव्हे, तर महाविकास आघाडीच्याच काळात गेला; माहिती अधिकारातून खुलासा