प्रतिनिधी
मुंबई : वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबससह लागोपाठ तीन मोठे प्रकल्प बाहेरच्या राज्यांमध्ये गेल्यामुळे विरोधकांनी शिंदे – फडणवीस सरकारवर टीका केल्यानंतर या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृतीतून उत्तर दिले असून, केंद्राकडून इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर करून आले आहे. त्यामुळे सुमारे 2000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. Electronic Manufacturing Cluster Approved in Maharashtra; 2000 crore investment
माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोमवारी त्यासंदर्भात घोषणा केली. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणातंर्गत महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात २ हजार कोटींची गुंतवणूक येणार असून, त्या माध्यमातून 5000 वर रोजगार निर्मिती होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नशील होते. गेल्या 2 महिन्यांत अनेकदा दिल्लीत जाऊन त्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. त्यानंतर दिल्लीतील अधिकारी पुण्यात येऊन गेले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. आता फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्राला मिळालेले हे एक मोठे गिफ्ट आहे.
- 297.11 एकर जागेवर हे क्लस्टर साकारणार
- 492.85 कोटी रुपये खर्च केले जाणार
- 207.98 कोटी रुपये हे केंद्र सरकार महाराष्ट्राला देणार
- आयएफबी रेफ्रिजरेशनचे काम सुरु, 450 कोटींची या एकट्या कंपनीची गुंतवणूक
- इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ई मोबिलिटी उत्पादक असे अनेक उद्योग राज्यात येणार
Electronic Manufacturing Cluster Approved in Maharashtra; 2000 crore investment
महत्वाच्या बातम्या
- सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त देशवासीयांना एकतेची शपथ!!
- पुण्यात मेट्रोच्या तिकिटासाठी आता रांगेत थांबण्याची नाही गरज; घ्या डिजिटल तिकीटे
- बेस्ट, सिटी बसप्रमाणे एसटीचे ही कळणार लाईव्ह लोकेशन; लवकरच अॅपमध्येही सुविधा
- महाराष्ट्रात सायबर इंटेलिजन्स युनिट उभारणार; सुरजकुंडच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांची माहिती
- राजस्थानात घृणास्पद प्रकार; भीलवाडा शहरात स्टॅम्प पेपरवर मुलींची विक्री