• Download App
    महाराष्ट्रातल्या महाभारतात नरो वा कुंजरो वा, कोणता संजय ठरणार अश्वत्थामा??election rajyasabha maharashtra

    राज्यसभा निवडणूक : महाराष्ट्रातल्या महाभारतात नरो वा कुंजरो वा, कोणता संजय ठरणार अश्वत्थामा??

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान सुरू असून सहापैकी 5 जागांवरील उमेदवार विजयी होतील, मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. राज्यसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार अनिल बोंडे यांनी सहावी जागाही जिंकू, असा विश्वास व्यक्त करून अश्वत्थामा गेलात असा दोन पैकी एक संजय जाणार असे भाकीत करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी आणि संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. election rajyasabha maharashtra

    कोणता तरी एक संजय जाणार

    राज्यसभेच्या तिनही जागेवर आमचा विजय होईल आम्ही 100 % जिंकणार, आम्हाला आत्मविश्वास आहे. आमच्या मनात या जागेबाबत अजिबात धाकधूक नाही. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला त्या प्रमाणे या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणतातरी एक संजय जाणार, असे म्हणत त्यांनी टोलाही लगावला आहे.

    काय म्हणाले अनिल बोंडे

    या निवडणुकीत संजय राऊत जाणार की संजय पवार जाणार यावर बोलताना भाजप नेते अनिल बोंडे म्हणाले, कोणता अश्वत्थामा गेला होता, हेदेखील धर्मराजाने सांगितले नव्हते. त्यामुळे कोणता संजय जाणार हे मी सांगणार नाही, ते नंतर कळेल. पण, महाविकास आघाडीतील एक कोणता तरी संजय जाणार नक्की. सायंकाळपर्यंत कोणता ते कळेल. संध्याकाळी कोणत्या संजयला समजवण्यासाठी जातील ते पाहू या!!

    election rajyasabha maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mazi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच ऑक्टोबरचा लाभ मिळणार; 410.30 कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता

    Nilesh Ghaiwal, : लंडनमध्ये नीलेश घायवळचा ठावठिकाणा सापडला; यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती

    Mumbai BMC : मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर; 11 नोव्हेंबरला सोडत, तर 28 तारखेला अंतिम आरक्षण