प्रतिनिधी
नवी दिल्ली : ठाकरे – शिंदेंच्या राजकीय वादात शिवसेनेचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवले आहे. यासंदर्भातला अंतरिम आदेश निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री जारी केला. अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक तसेच याप्रकरणी आयोग अंतिम आदेश देईपर्यंत हा आदेश कायम राहील. Election Commission freezes Shiv Sena’s name and symbol amid Thackeray-Shinde political controversy
त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्याही गटाला शिवसेनेचे नाव किंवा निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. या दोन्ही गटांना त्यांच्या पक्षाचं नवं नाव आणि निवडणूक चिन्हांचे प्राधान्यक्रम सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत द्यायचे आहेत. या नावात त्यांना शिवसेनेचं नाव वापरण्याची मुभा निवडणूक आयोगानं दिली आहे. अंधेरी निवडणुकीत ठाकरे गट आधि शिंदे गट अशा नावाने निवडणूक लढवावी लागेल, अशी माहिती समोर येत आहे.
निवडणूक आयोगाचे मत काय?
आयोगाने म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या वतीने अनिल देसाई यांनी 25 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काही आमदारांनी केलेल्या पक्षविरोधी कारवायांची माहिती आयोगाला दिली. ‘शिवसेना किंवा बाळासाहेब’ या नावांचा वापर करून कोणताही राजकीय पक्ष स्थापन करण्यावर त्यांनी अगोदरच आक्षेप घेतला होता.
उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असल्याची देसाईंची आयोगाला माहिती
उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख असल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर अनिल देसाई यांच्या दिनांक 01.07.2022 च्या ईमेलमध्ये 30.06.2022 रोजी जारी करण्यात आलेली 3 पत्रे जोडली होती, ज्यामध्ये पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या चार सदस्यांनी स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडल्याचे नमूद केले होते. त्यामुळे शिवसेनेतील नेत्याची पक्षाच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. यात एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, उदय सामंत यांचा समावेश होता.
Election Commission freezes Shiv Sena’s name and symbol amid Thackeray-Shinde political controversy
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरे -प्रकाश आंबेडकर एकत्र येणार : महापालिकांसाठी युतीची तयारी; मुंबई, औरंगाबाद मनपात विजयासाठी रणनीती
- अंधेरी पोटनिवडणूक : शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा, शिंदे गट हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप
- राष्ट्रवादीचा आरोप :मुख्यमंत्र्यांचा बीकेसीवरील मेळावा फेल, तपासे म्हणाले- धोरणही जाहीर करता आले नाही
- ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणार्या मोदींच्या रेल्वे मंत्रालयात चार लाख डॉलरची लाच; सीबीआयमार्फत चौकशी करण्याची राष्ट्रवादीची मागणी