• Download App
    Election chaos in 22 places affects elections in all 288 villages; results of all postponed!! 22 ठिकाणच्या निवडणूक गोंधळाचा सर्व 288 गावांमधल्या निवडणुकांना फटका

    22 ठिकाणच्या निवडणूक गोंधळाचा सर्व 288 गावांमधल्या निवडणुकांना फटका; सगळ्यांचाच निकाल पुढे ढकलला!!

    Devendra Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : 22 ठिकाणच्या निवडणूक गोंधळाचा सर्व 288 गावांमधल्या निवडणुकांना फटका बसला. कारण सर्व नगरपरिषदा आणि नगरपालिकांचा निवडणूक निकाल मुंबई हायकोर्टाने पुढे ढकलला. आज 2 डिसेंबरला मतदान होऊन उद्या 3 डिसेंबरला निकाल लागणे अपेक्षित असताना निकालाची तारीख आता 21 डिसेंबर वर गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकारावर तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली.Election chaos in 22 places affects elections in all 288 villages; results of all postponed!!

    निवडणूक आयोगाने मतदानाच्या आदल्या दिवशी कालच 22 ठिकाणच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक स्थगित केली. तिची नवी तारीख 20 डिसेंबर अशी जाहीर केली. त्यामुळे काही लोक मुंबई हायकोर्टात गेले. सर्वच निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरला लावावा, असा युक्तिवाद केला. उद्या 3 डिसेंबरला निकाल जाहीर केले तर त्याचा परिणाम पुढच्या निवडणुकांवर होईल, असा त्यांचा प्रमुख युक्तिवाद होता. तो मुंबई हायकोर्टाने ग्राह्य धरला आणि सर्व ठिकाणच्या निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्याचबरोबर exit polls चे निष्कर्ष सुद्धा 20 डिसेंबरला मतदान संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करायला सांगितले.



    – फडणवीसांची तीव्र नाराजी

    या निवडणुकीचा असा खेळ खंडोबा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. निवडणूक ऐन मध्यावर आलेली असताना अचानक निवडणूक पुढे ढकलणे त्यानंतर सगळा निकालच पुढे ढकलणे असला प्रकार पहिल्यांदा बघतो आहे. यापूर्वी अनेक निवडणुका झाल्या तेव्हा असल्या कुठलाही प्रकार घडला नव्हता. पण निवडणुकीच्या कायद्याचे चुकीचे विश्लेषण करून मुंबई हायकोर्टात निवडणूक आयोगाच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे. त्यामुळे असा निर्णय आला आहे. तो आता सगळ्यांना मान्य करावा लागेल, पण जे काही घडले ते चुकीचेच घडले. निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठी सुधारणा करणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने ती केलीच पाहिजे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

    Election chaos in 22 places affects elections in all 288 villages; results of all postponed!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदेमातरम वरच्या चर्चेवर राहुल गांधींचे No comments; पण पत्रकारांशी कुत्र्याच्या मुद्द्यावर चर्चा!!

    राममंदिर झाले, आता राष्ट्रमंदिराची उभारणी; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; आदित्य प्रतिष्ठानचा कृतज्ञता पुरस्कार प्रदान

    CM Fadnavis : निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय चुकीचा, मुख्यमंत्र्यांची EC वर टीका; शिंदेंची भेट न झाल्यावरही खुलासा