विशेष प्रतिनिधी
ठाणे : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दिवाळी साजरी केली. दिवाळी पूर्वसंध्येला आज ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी खास स्वरदीपावली या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी उपस्थित राहून बहुसंख्येने जमलेल्या नागरिकांशी संवाद साधून दीपावली आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. Dharashiv
आज आपण दिवाळीचा सण साजरा करत असलो तरीही दुसरीकडे मराठवाड्यात पूरस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना हे अश्रू थेट त्यांच्या बांधावर जाऊन पुसण्याचे काम शिवसेनेने केले आहे. त्यामुळेच दसरा मेळाव्याला मुंबईत न येता आपतग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन मी शिवसैनिकांना केले होते. त्यानुसार त्यांनी शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्यांचे घर पुन्हा उभे करण्यासाठी त्यांना मदत केली, तसेच त्यांना मदत साहित्य देऊन त्यांना आधार दिला.
धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेची मदत
धाराशिव जिल्ह्यातील ज्या साडेसांगवी गावातील मुलींनी माझ्याकडे शाळेत जाण्यासाठी सायकलची मागणी केली होती, ती मागणी मी तात्काळ पूर्ण केली. तसेच धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्याच गावात जाऊन स्थानिकांना मदत देत दिवाळी साजरी केली. तसेच या गावातील ज्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे गावाला जोडणारा नदीवरचा पूल मोठा करण्याची मागणी केली होती, त्याचे भूमिपूजन देखील ते झाले.
शिवसेना ही कायम गरजवंतांच्या मदतीला धावून जाणारा पक्ष आहे, कोणतेही संकट असले तरी तेव्हा मदतीसाठी एकनाथ शिंदे सगळ्यात पुढे असतो. काही दिवसांपूर्वी इथे येऊन काही जण लवंगी फटाके वाजवून गेले मात्र पालिका निवडणुकीत आमचा आयटम बॉम्ब फुटेल आणि विरोधकांचे काम तमाम झालेले तुम्हाला दिसेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
यावेळी सौ. लता शिंदे, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव संजय मोरे, राम रेपाळे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, लोकसभा संपर्कप्रमुख मनोज शिंदे, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ.मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक संजय वाघुले, सुधीर कोकाटे, पवन कदम, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेना सर्व पदाधिकारी शिवसैनिक आणि ठाणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Eknath Shinde’s Shiv Sena celebrates Diwali by providing aid to those affected by heavy rains in Dharashiv!!
महत्वाच्या बातम्या
- Belgian Court : फरार मेहुल चोक्सीला भारतात परत पाठवण्यास मंजुरी; बेल्जियम न्यायालयाचा निकाल
- Pakistan Airstrike, : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; युद्धबंदीचा भंग, सीमावर्ती भागातील अनेक घरे लक्ष्य
- पश्चिम महाराष्ट्रातल्या स्वबळाची शिंदे सेनेकडून चाचपणी; शासनाच्या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचविण्यावर भर!!
- Amit Shah : अमित शहा म्हणाले- तेजस्वींचा नोकरीचा दावा खोटा