प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्ह करत शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले होते. माझ्या माणसांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेन तर मला समोर येऊन सांगा, मी माझ्या राजीनामा पदाचा राजीनामा द्यायला तयार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या भावनिक आवाहनाला आता एकनाथ शिंदे यांनी थेट वास्तववादी उत्तर दिले आहे. Eknath Shinde’s realistic answer to Uddhav Thackeray’s emotional drama
एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसैनिक कसा भरडला गेला, हे सांगताना शिंदे यांनी चार मुद्दे मांडले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमधील मुद्दे
- गेल्या अडीच वर्षात म. वि. आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला.
- घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
- पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
- महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.
असे सांगत एकनाथ शिंदे यांनी #HindutvaForever असा हॅशटॅग सुद्धा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांचे आवाहन
माझ्याच पक्षातल्या माझ्या माणसांना मी नको असेन तर मग काय करायचं? माझ्या लोकांना जर मी मुख्यमंत्रीपदी नको असेन तर त्यांनी ते सुरत आणि इतर ठिकाणी जाऊन बोलण्यापेक्षा मला समोर येऊन सांगायचं होतं. त्यांच्यापैकी एकाही आमदाराने मला सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्रीपदी नको, तर मी आता माझा राजीनामा द्यायला तयार आहे. यावर जर कोणाचा विश्वास नसेल तर आज संध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीला हलवत आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केले होते.
Eknath Shinde’s realistic answer to Uddhav Thackeray’s emotional drama
महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदेंचा गुवाहाटीतून शिवसेनेला जबरदस्त दणका; सुनील प्रभुंना हटवले, भरत गोगावलेंची प्रतोदपदी!!
- Eknath Shinde Profile : एकेकाळी रिक्षाचालक होते एकनाथ शिंदे, जाणून घ्या, कसे चमकले राजकीय पटलावर? दिग्गज नेते कसे बनले?
- शिवसेनेला खिंडार : “बाळासाहेब ठाकरे निष्ठ” शिवसेना गुवाहाटीत; “पवार निष्ठ” शिवसेना मुंबईत!! वाचा कोण कुणाला कसे समजवतेय??