गांधींवरही साधला आहे निशाणा, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम, गृहमंत्री अमित शाह यांचे नियोजन, या निवडणुकांमध्ये भाजपा आणि एनडीएला प्रचंड विजय आणि यश देऊन गेलं. आतापर्यंत लोक म्हणत होते घरघर मोदी आता या निवडणुकांमध्ये ‘मन मन मै मोदी’ अशाप्रकारचं निकाल या चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिला.” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तीन राज्यात भाजपने मिळवलेल्या यशावर प्रतिक्रिया दिली आहे. Eknath Shindes first reaction to BJPs victory in Assembly Elections
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला जोरदार यश मिळालं. या तिन्ही ठिकाणी भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचं आतापर्यंत समोर आलेल्या निकालांवरून जवळपास स्पष्ट झालं आहे. या निकालांवर आता देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, ” मोदींचा करिष्मा, मोदी आज जगभरात लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. हे या निवडणूक निकालातून सिद्ध झालं आहे. अनेकजण म्हणायचे मोदींचा करिष्मा संपला, या निवडणुकीत भाजपा पराभूत होईल. आरोप-प्रत्यारोप मोठ्याप्रमाणावर मोदींवर झाले. परंतु शेवटी जनताजनार्दन सर्वस्वी असतो आणि या निवडणुकीत जनतेने मोदींनी साथ दिली. त्यामुळे तीन राज्यांमध्ये अतिशय बहुमताने भाजप आणि एनडीएला विजय मिळाला.”
याचबरोबर राहुल गांधींवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, ”काँग्रेसच्या राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली, परंतु परदेशात जाऊन भारत तोडो अशाप्रकारची भारताची बदनामी ते करत होते. पंतप्रधान मोदींची बदनामी परदेशात जाऊन करत होते. त्यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवला. त्यांची जागा दाखवली.”
Eknath Shindes first reaction to BJPs victory in Assembly Elections
महत्वाच्या बातम्या
- छत्तीसगडमधील निकालापूर्वी भूपेश बघेल यांनी मोदींना लिहिले पत्र, केली मोठी मागणी!
- राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातील मतमोजणीला सुरुवात
- मंत्रिमंडळ बैठकीत झाले 8 महत्त्वाचे निर्णय; अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने करणार मदत
- व्हॉट्सॲपने ऑक्टोबरमध्ये भारतात 75 लाखांहून अधिक बनावट खात्यांवर घातली बंदी