• Download App
    एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना शह : उद्धव यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा|Eknath Shinde's Check to Thackeray transfers of officials Who Were in favor of Uddhav Thackeray

    एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना शह : उद्धव यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा

    प्रतिनिधी

    मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार घेतल्यापासून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेत्यांच्या जवळच्या असलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याचा सपाटाच लावला आहे.Eknath Shinde’s Check to Thackeray transfers of officials Who Were in favor of Uddhav Thackeray

    औरंगाबाद मनपाचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, नाशिक महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांची शिंदे यांनी बदली केली असून त्यांना नियुक्ती दिली नाही. पवार व पांडेय हे मातोश्रीच्या जवळचे मानले जातात. त्यामुळेच त्यांना वेटिंगवर ठेवल्याचे बोलले जाते. फडणवीसांच्या जवळचे समजले जाणारे पंतप्रधान कार्यालयातील अनुभव असलेले सनदी अधिकारी श्रीकर परदेशी यांची फडणवीसांच्या कार्यालयाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे..



     

    अश्विनी भिडे, भाऊसाहेब दांडगे या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दांडगे यांची कल्याण-डोंबिवली महापलिकेच्या आयुक्तपदी, तर मुख्याधिकारी अजीज शेख यांची उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली. साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बदली केली.

    Eknath Shinde’s Check to Thackeray transfers of officials Who Were in favor of Uddhav Thackeray

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात