प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने तीच तीच टीका करत आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना, तीच कॅसेट पुन्हा – पुन्हा वाचवू नका. निदान स्क्रिप्ट रायटर तरी बदला, अशा खोचक शब्दांत टोला हाणला आहे. शिवसेनेच्या 57 व्या वर्धापन दिन नेस्को संकुलात आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. Eknath shinde targets uddhav thackeray over his old fashioned criticism
एकनाथ शिंदे म्हणाले :
- खोके कुठं गेले हे जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेबांची पुण्याई आहे. पण तुम्ही आपल्या मर्यादेत राहा. एक नोटीस आली तर हे मोदी – शाह यांच्याकडे धावत गेले.
- मागील वर्षी 20 तारखेला क्रांतीची सुरुवात झाली. आपण सगळ्यांनी उठाव केला. अनेक देशांनी आपल्या उठावाची दखल घेतली. शिवसेना – भाजप युतीचे सरकार स्थापन केले. लोकांच्या मनातील सरकार स्थापन केले.
- खुर्चीसाठी बाळासाहेबांचं विचार तुम्ही सोडले. तुम्ही गद्दारी केली. आम्ही गद्दारी केली नाही. शिवसेनेचा धनुष्य बाण तुम्ही काँग्रेस – राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता, तो आम्ही सोडवून आणला.
- अडीच वर्षाच्या काळात मागील मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या सह्या केल्या नसतील तेवढ्या सह्या मी मागील 11 महिन्यात केल्या आहेत. मागच्या मुख्यमंत्र्यांकडे पेनच नव्हता. माझ्याकडे दोन पेन आहेत. मी गाडीतून फाईल घेऊन जातो, त्यात सह्या करतो. रस्त्यावर, वेळ मिळेल तशा सह्या करतो आणि फाईल मार्गी लावतो.
- मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अडीच वर्षात दोन कोटींची मदत नागरिकांना देण्यात आली होती. मात्र, या 11 महिन्यात लोकांसाठी 75 कोटी वाटले. लोकांसाठी सरकार असून त्यांच्या कामी निधी आला पाहिजे.
- आमच्यावर कितीही टीका केली तरी आम्ही कामातून उत्तर देणार आहोत. तीच कॅसेट सारखी वाजवू नका. तेच तेच सारखे बोलताय… किमान स्क्रिप्ट रायटर्स बदला!!
- वाघाची डरकाळी फोडेपर्यंतच तुमची कोल्हेकुई सुरू राहील. वाघ जंगलात आल्यानंतर अनेकजण पळून गेले. उठाव करायला वाघाचं काळीज लागतं. आम्ही उठाव केला.
Eknath shinde targets uddhav thackeray over his old fashioned criticism
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीरमध्ये मोठा घातपात टळला! लष्कराने ११ जिवंत बॉम्बसह ६१ स्फोटके केली नष्ट
- आधी पक्षातून हकालपट्टी नंतर अटकही, ‘द्रमुक’च्या प्रवक्त्याला भाजपा नेत्या खुशबू सुंदरवर केलेली वादग्रस्त टिप्पणी भोवली!
- घरात बसणार्यांना मोदी-शाह काय कळणार? अकोल्यात फडणवीसांची बोचरी टीका
- ‘’अरे, ये मुंगेरीलाल के हसीन सपने कितने दिन देखोगे?’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना सवाल!