विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट या ठिकाणी असलेला पुतळा कोसळला. ज्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी पुढाकार घेऊन महायुतीच्या सरकारला जोडे मारा आंदोलन केले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीला जनताच निवडणुकीत जोडे मारणार असल्याचे प्रत्युत्तर दिले. निवडणुकीचे घोडामैदान जवळ आले आहे. महाविकास आघाडीला पराभव दिसू लागला आहे त्यामुळे हे आंदोलन केल्याचे टीकास्त्र एकनाथ शिंदे यांनी सोडले. Congressmen must beaten with shoes, eknath shinde targets
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान… त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असे म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असं म्हणत शेकडो कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले. तसंच गद्दारांना माफी नाही, शिवद्रोहींना माफी नाही अशा घोषणाही यावेळी दिल्या. या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले सहभागी झाले होते. हुतात्मा स्मारकाला अभिवादन करुन हा मोर्चा काढला. मात्र हा मोर्चा शिवरायांच्या प्रेमासाठी नाही, तर राजकीय हेतूने प्रेरित आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिले
एकनाथ शिंदे म्हणाले :
- महाविकास आघाडीचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. ही अतिशय वाईट आणि दुःखद घटना आहे. आमच्यासाठी ही बाब संवेदनशील आहे. तमाम महाराष्ट्राचे शिवभक्त या घटनेने भावनिक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या अस्मितेचा विषय आहेत. मात्र घडलेल्या घटनेचं राजकारण करणं हे विरोधक करत आहेत. हे जास्त दुर्दैवी आहे.
- कर्नाटकात काँग्रेस सरकारने बुलडोझर लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून तोडला. आता तेच काँग्रेसवाले आंदोलन करत आहेत. या काँग्रेसवाल्यांनाच खरंतर जोड्याने मारले पाहिजे. ते सोडून आता मुंबईत आंदोलन करत आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता समजदार आहे. येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनताच जोड्याने मारणार आहे.
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हे लोक कोर्टात गेले. आधी मुंबई उच्च न्यायालयात गेले, आता नागपूर खंडपीठात गेले. गरीब भगिनींना आम्ही पैसे देत आहोत तर यांच्या पोटात का दुखतं?? यावरूनच महाविकास आघाडीतल्या नेत्यांची मानसिकता समजते.
Congressmen must beaten with shoes, eknath shinde targets
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : कोर्टात वारंवार गैरहजेरीमुळे राज ठाकरेंविरुद्ध अटक वॉरंट; 2008 मध्ये कार्यकर्त्यांकडून बसवर दगडफेकीचा खटला
- Bangladesh : बांगलादेशात आता विद्यार्थी राजकारणावर बंदी; नवे सरकार घटना बदलून 33% महिला आरक्षण संपवणार
- Lobin Hembram: चंपाई सोरेननंतर आता लोबिन हेम्ब्रम यांनी भाजपमध्ये केला प्रवेश!
- Shyam Rajak : ‘राजद’ सोडल्यानंतर आता श्याम रजक पुन्हा ‘जेडीयू’मध्ये जाणार!