• Download App
    मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडली व्यथा; मागच्या सत्तेत शिवसैनिकाला मिळाल्या तडीपाऱ्या!! Eknath shinde put agony of shivsaink in maharashtra legislative assembly

    मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडली व्यथा; मागच्या सत्तेत शिवसैनिकाला मिळाल्या तडीपाऱ्या!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास दर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर आज विधानसभेत केलेल्या भाषणात सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथांना वाचा फोडली शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही आधीच्या सत्तेत शिवसेने त्यांना वाँटेड आणि तडीपाऱ्या याखेरीज काही मिळालं नाही. शिवसैनिक गांजले होते. सत्ता असूनही तळागाळातल्या शिवसैनिकांना काही मिळत नसेल तर काय उपयोग? अशा शब्दात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. Eknath shinde put agony of shivsaink in maharashtra legislative assembly

    अजित पवारांनी १०० आमदारांचे टार्गेट ठेवले होते, कारण मुख्यमंत्री १०० झाल्यानंतर होता येते. जयंत पाटील तर जिकडे जातील तिकडे इथला आमदार आमचाच होणार, असे सांगायचे. त्यामुळे आमच्याकडील आमदारांची चलबिचल सुरू होती.  काही ठिकाणी जयंत पाटील शिवसैनिकांना सांगायचे ‘तुम्ही एनसीपीमध्ये या.’ जळगावचा तालुकाप्रमुख खडसेंच्या भीतीने गायबच आहे. सहा महिने वॉन्टेड आहे. त्यांना सांगितले आहे ‘आता मी मुख्यमंत्री आहे तेव्हा तुम्ही आता या.’ सांगलीचा आमचा एक माणूस आहे, त्याने काही केले नाही, तरी तडीपारी लावली आहे. त्याला आतमध्ये टाकले. मी वरिष्ठांना सांगितले, मात्र काही झाले नाही. मी जर तिकडे असतो, तर डीजीला फोन करून तात्काळ त्याला सोडवण्यास सांगितले असते. निर्दोष माणसाला आतमध्ये घातला. नंतर त्यांच्या कुटुंबाकडे एनसीपीचे लोक गेले आणि म्हणाले, राष्ट्रवादीत या, त्याला निर्दोष करतो, असे सांगितले. अगदी रडत होते. सत्तेतून शिवसैनिकाला काय मिळाले तडीपाऱ्या, वाँटेड. या सत्तेतून शिवसैनिकाला काय मिळाले, काहीच मिळाले नाही, अशी व्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली.

    शिवसैनिक माझ्याकडे येऊन रडायचे

    हे नाराज शिवसैनिक माझ्याकडे येऊन रडायचे, सत्ता असून आम्हाला काही फायदा नाही, असे सांगायचे. तुम्ही एकटे आमचे ऐकता म्हणायचे. मी मोकळाच होतो म्हणून ऐकायचो सगळ्यांचे. मी काय फुल टाइम असतो, रात्री ३ वाजता घरी जातो, त्यामुळे ते सगळे म्हणायचे ‘तुम्हीच आमचे ऐकता.’ नगरविकास खात्यातून १ कोटी, २ कोटी निधी द्यायचो आणि तुमच्याकडची कामे करा, असे सांगायचो. सत्तेचा फायदा हा जिल्हाप्रमुखाला, तालुकाप्रमुखाला, विभागप्रमुख, शाखाप्रमुखाला झाला पाहिजे होता, मी एकटा जेवढे होईल तेवढे करायचो, पण मलाही मर्यादा होत्या.

    – बाळासाहेबांनीच आम्हाला घडविले

    आता शिवसैनिकाला कळले की, आम्ही घेतलेली भूमिका ही बाळासाहेबांची आहे, हे समजल्यामुळे आता ते बघा कसे प्रतिसाद देतात. आम्हाला प्रतिज्ञापत्र घेण्याची गरज लागत नाही. शिवसैनिक मनातून आमच्यासोबत आहे. पण आम्हाला इथेच अडकवून ठेवले आहे. समोरचे सारखे सर्वोच्च न्यायालयात जात आहेत. न्यायालय हे सांगत आहे, ११ जुलै ला होईल सगळे, तुम्ही का वारंवार येत आहात. एकदा का इथून मी मोकळा झालो की, मग तिकडे लक्ष देतो, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

    Eknath shinde put agony of shivsaink in maharashtra legislative assembly

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!