‘’मी सगळ्यांना कामाला लावलं आहे ही वस्तूस्थिती आहे.’’ असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
विशेष प्रतिनिधी
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज ठाण्यातून शेकडोच्या संख्येने रामभक्त अयोध्येला रवाना झाले आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वत: ठाणे स्टेशनवर आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. Eknath Shinde indirectly criticized Uddhav Thackeray
‘’माझ्या दौऱ्याची धास्ती घेतली किंवा नाही हे काही मी म्हणणार नाही. परंतु मी सगळ्यांना कामाला लावलं आहे ही वस्तूस्थिती आहे. सगळे आता घरात बसायचे ते रस्त्यावर येऊ लागले आहेत, फिरू लागले आहेत ही चांगली बाब आहे.’’ असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावल्याचे दिसून आले.
याशिवाय, अयोध्या दौऱ्यात मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार आहे. अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा यशस्वी व्हावा, यासाठी भाजपाही मैदानात उतरली आहे. भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच, उत्तर प्रदेशातील भाजपाचे आमदार त्यांच्यासोबत असणार आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून टिप्पणी केली होती. एकनाथ शिंदे यांना अयोध्येचा रस्ता आम्ही दाखवलाय, त्यांना याअगोदर अयोध्येची वाट तरी माहीत होती का? आम्ही दाखवली आहे. असं संजंय राऊत म्हणाले होते.
Eknath Shinde indirectly criticized Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- अयोध्या हा आमच्यासाठी अतिशय श्रद्धेचा, भक्तीचा आणि अस्मितेचा विषय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- उद्धव ठाकरेंनी कुठूनही निवडणूक लढावी, त्यांच्याविरोधात मी लढायला तयार; नवनीत राणांचे आव्हान
- राहुलजी, नानांशी पंगा; अखेर आशिष देशमुखांचं काँग्रेसमधून निलंबन
- सरसंघचालक म्हणाले, ‘दक्षिण भारतात मिशनऱ्यांपेक्षा हिंदू धर्मगुरूंनी जास्त सेवा केली’
- Indian Space Policy 2023 : मोदी सरकारची ‘भारतीय अंतराळ धोरण 2023’ला मंजुरी