• Download App
    एकनाथ शिंदेंनीही हेमंत पाटील, भावना गवळींच्या भाकऱ्या फिरवल्या; पण खासदारांच्या आकड्यातल्या तूटी टाळल्या!!Eknath Shinde also turned the tables of Hemant Patil, Bhavana Gawli; But the deficits in the number of MPs were avoided!!

    एकनाथ शिंदेंनीही हेमंत पाटील, भावना गवळींच्या भाकऱ्या फिरवल्या; पण खासदारांच्या आकड्यातल्या तूटी टाळल्या!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मोदी – शाहांच्या पावला पाऊल टाकत एकनाथ शिंदे यांनी भाकऱ्या फिरवल्या; खासदारांच्या आकड्यातल्या तूटी टाळल्या!! एकनाथ शिंदे यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आधी खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. पण आज अखेरीस त्यांचे तिकीट कापले. यवतमाळ – वाशिम मधून खासदार भावना गवळी यांचेही तिकीट कापले.Eknath Shinde also turned the tables of Hemant Patil, Bhavana Gawli; But the deficits in the number of MPs were avoided!!

    पण एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांचे हिंगोलीतून तिकीट कापले, तरी त्यांची थोडी बूजही राखली. त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना भावना गवळींच्या जागी यवतमाळ – वाशिम मधून तिकीट दिले. हिंगोलीतून हेमंत पाटील यांच्या जागी बाबूराव कदम कोहळीकर यांचे नाव निश्चित केले.



    एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला धडाका लावून आपल्या 8 उमेदवारांची नावे निश्चित केली होती. परंतु, नंतर मात्र त्यांना भाजपच्या सर्वेक्षणापुढे मान तुकवावी लागली. कारण ज्या जागा केवळ अँटी इन्कमबन्सी मुळे फटका बसून निवडून येणारच नाहीत, तिथे उमेदवार बदलला नाही, असा ठपका एकनाथ शिंदे यांच्यावर बसला असता. तो ठपका शिंदे यांनी उमेदवार बदलून टाळला.

    यातून एकनाथ शिंदे यांना तडजोड करावी लागली, भाजप पुढे मान तुकवावी लागली, एकनाथ शिंदे यांच्यावर नामुष्की ओढवली वगैरे भाषांमध्ये बातम्या आल्या असल्या, तरी प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांनी भाजप नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली योग्य ठिकाणी भाकऱ्या फिरवून महाराष्ट्रात शिवसेनेमुळे येऊ शकणारी संभाव्य खासदार संख्येची तूट टाळली.

    Eknath Shinde also turned the tables of Hemant Patil, Bhavana Gawli; But the deficits in the number of MPs were avoided!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!