विशेष प्रतिनिधी
पुणे : Pranjal Khewalkar राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई व रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. परवानगीशिवाय ,महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात पुण्यातील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी रेव्ह पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यात आता आणखी एका नवीन प्रकरणामुळे त्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.Pranjal Khewalkar
या नव्या प्रकरणात, एका महिलेच्या तक्रारीनुसार प्रांजल खेवलकरने तिची संमती न घेता व्हिडिओ आणि फोटो काढले, असा आरोप केला आहे. या महिलेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आयटी अॅक्ट 665ई आणि बीएनएस कलम 77 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यामुळे रेव्ह पार्टी प्रकरणानंतर खेवलकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.Pranjal Khewalkar
प्रांजल खेवलकर यांच्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रांजल खेवलकर यांच्या मोबाइलमध्ये एका हिडन फोल्डरमध्ये शेकडो अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडले होते. तसेच महिला तस्करी झाल्याचा देखील गंभीर आरोप चाकणकर यांनी केला होता.
पुण्यात काही दिवसांपूर्वी खराडी येथील एका घरात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाड टाकली असता प्रांजल खेवलकर यांच्यासह त्याचे मित्र व दोन महिलांना ताब्यात घेतले. तसेच यावेळी तिथे दारूसह अमली पदार्थ जसे गांजा व कोकेन देखील सापडले होते. त्यानंतर प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. आता नवीन प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
New Case Filed Eknath Khadse Son in Law Pranjal Khewalkar
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीत हुमायूं मकबरा परिसरात छत कोसळले, 6 जणांचा मृत्यू; डीएम म्हणाले- हे लोक ASIच्या जागेवर अवैध राहत होते
- हाय पॉवर डेमोग्राफी मिशन, समुद्र मंथन, मेड इन इंडिया जेट इंजिन… लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान मोदींच्या 9 मोठ्या घोषणा
- Akhilesh Removes Pooja Pal : अखिलेश यांनी आमदार पूजा पाल यांना सपामधून काढले; विधानसभेत म्हणाल्या होत्या- योगींनी अतिकला संपवले
- पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून संघाचा गौरव केल्याने सर्व विरोधकांचा चडफडाट; संघ चीन पेक्षा जास्त धोकादायक असल्याचा कांगावा!!