विशेष प्रतिनिधी
भुसावळ : Eknath Khadse राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची चांगलीच फजिती झाली. भर सभेत भाषण करताना खडसे यांची जीभ घसरली आणि त्यांनी उपस्थितांना चक्क “भाजपला मतदान करा,” असे आवाहन केले. खडसेंच्या या विधानामुळे व्यासपीठावर आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. नंतर कार्यकर्त्यांनी आठवण करून देताच खडसेंनी सारवासारव करत “तुतारीलाच मतदान करा,” अशी दुरुस्ती केली. मात्र, तोपर्यंत हे वक्तव्य राजकीय चर्चेचा विषय बनले होते.Eknath Khadse
भुसावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना खडसे जोमाने भाषण करत होते. भाषणाच्या ओघात त्यांनी, “आगामी निवडणुकीत भाजपला मतदान करा,” असे आवाहन करून टाकले. हे ऐकताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. कार्यकर्त्यांनी लागलीच त्यांना ‘तुतारी’ चिन्हाची आठवण करून दिली. त्यानंतर खडसेंनी आपली चूक मान्य करत, “अनेक वर्षे भाजपमध्ये काम केल्याने कमळाचा उल्लेख चुकून तोंडून निघाला, पण तुम्ही तुतारीलाच मतदान करा,” असे स्पष्टीकरण दिले.Eknath Khadse
पवार साहेबांनीच सांगितले असेल.., काँग्रेसचा टोला
खडसेंच्या या विधानावर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. चव्हाण म्हणाले, “एकनाथ खडसे जर ‘बिन बुलाये मेहमान’ प्रमाणे आमचा प्रचार करत असतील आणि त्यामुळे भाजपचे संघटन वाढत असेल, तर आम्हाला काहीच आक्षेप नाही. शरद पवार यांनी त्यांना पक्षात घेतले, आमदारकी दिली, पण आज ते भाजपचे नाव घेत आहेत. कदाचित खुद्द पवार साहेबांनीच त्यांना भाजपचा छुपा प्रचार करायला सांगितले असावे,” अशी खोचक टीका चव्हाण यांनी केली आहे.
मुक्ताईनगरनंतर भुसावळ कनेक्शन?
एकनाथ खडसेंचे हे विधान केवळ ‘स्लिप ऑफ टंग’ आहे की यामागे वेगळे राजकीय गणित आहे, याची चर्चा जळगाव जिल्ह्यात सुरू झाली आहे. यापूर्वी मुक्ताईनगर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मुक्ताईनगरमध्ये “आमच्याकडे सक्षम उमेदवार नाही,” असे कारण खडसेंनी दिले होते. या निर्णयामुळे एकनाथ खडसे हे भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना अप्रत्यक्ष मदत करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यातच आता भुसावळमध्ये भाषणावेळी थेट भाजपला मतदान करण्याचे आवाहन केल्याने खडसेंच्या मनात नक्की चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Eknath Khadse Slip of Tongue BJP Appeal NCP Sharad Pawar Bhusaweal Photos Videos Report
महत्वाच्या बातम्या
- Lt Gen Manjinder Singh : लेफ्टनंट जनरल म्हणाले- पाकने 90 तासांत गुडघे टेकले, ऑपरेशन सिंदूरमध्ये दीर्घ लढाईची तयारी होती
- Adani : अदानींनी 5 वर्षांपूर्वीचा कायदेशीर खटला संपवला; कोळसा खाण प्रकरणात ऑस्ट्रेलियाच्या कार्यकर्त्याशी समझोता
- पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत कंबर कसून उतरल्या का नाहीत??
- भय्याजींच्या दूरदृष्टीतून ईशान्य भारतात ईश्वरी कार्य ऊभे; भैय्याजी जोशींचे गौरवोद्गार; भैय्याजी काणे जन्मशताब्दी सांगता