• Download App
    Eknath Khadse एकनाथ खडसे यांचे खुलासा, भाजप प्रवेशाचे गणपतीसह विसर्जन, मी आता राष्ट्रवादीतच राहणार!

    Eknath Khadse : एकनाथ खडसे यांचे खुलासा, भाजप प्रवेशाचे गणपतीसह विसर्जन, मी आता राष्ट्रवादीतच राहणार!

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : Eknath Khadse मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गणपती विसर्जनासह माझा भाजप प्रवेशही विसर्जित झाला. आता मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातच राहणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्‍पष्ट केले आहे.

    अमित शहांच्या दौऱ्यात भाजप प्रवेश होणार असल्याच्या चर्चा

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत आपला भाजपमध्ये प्रवेश झाला होता. मात्र भाजपकडून त्याची औपचारिक घोषणा झाली नाही. गिरीष महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामुळे आपल्या भाजप प्रवेशाची घोषणा झाली नाही, असे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 25 सप्टेंबरच्या नाशिक दौऱ्यात एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता एकनाथ खडसे यांनीच आपल्या भाजप प्रवेश गणपती विसर्जनासोबत विसर्जित झाल्याचे सांगितल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. Eknath Khadse


    Maldives : ‘थँक्यू इंडिया’, संकटात सापडलेल्या मालदीवच्या मदतीला भारतच आला धावून


    राष्ट्रवादी अजित पवार गटाने केली होती टीका

    एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जाण्याची घोषणा केली होती. पण काही कारणांमुळे त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत आपला भाजपमध्ये प्रवेश झाला होता. मात्र भाजपकडून त्याची औपचारिक घोषणा झाली नाही, असा गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली होती. स्वतःच्या स्वार्थासाठी कुणी किती पक्ष फिरावेत, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे चाकणकर म्हणाल्या होत्या. Eknath Khadse

    Eknath Khadse says Will Not join BJP, I will stay in NCP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस