विशेष प्रतिनिधी
जळगाव : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे वैर सर्वांना ठाऊक आहेच. एकनाथ खडसे यांनी जेव्हा भाजप पक्ष सोडला होता तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बरेच गंभीर आरोप केले होते. त्यांनी असेही म्हटले होते की, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मी भाजप सोडत आहे.
Eknath Khadse gave impromptu reply to people calling Watermelon
जळगावमधील मुक्ताईनगरमधील जोंधळ खेडा धरणाच्या जलपूजन कार्यक्रमात बोलताना मात्र एकनाथ खडसे यांची जीभ पुन्हा एकदा घसरलीच. एकनाथ खडसे पत्रकारांशी संवाद साधत असताना तेथे उपस्थित कार्यकर्त्यांनी टरबूज असा आवाज देण्यास सुरूवात केली. यावर अतिशय शांतपणे एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, आज जेव्हा घरी जाल तेव्हा एक काम पहिल्यांदा करा, इंटरनेट ओपन करा, गुगलवर जा आणि ‘टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण’ असा प्रश्न टाका. उत्तर तुमचे तुम्हाला मिळून जाईल.
गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की जामनेर वाल्यांचं ऐकून माझ्या मागे ईडी लावली गेली. नाथाभाऊंच्या मागे इन्कम टॅक्स, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लावायचं. घरी दोन वेळा इन्कम टॅक्समध्ये येऊन गेले. परत एकदा धाड टाकली होती. मी फार्महाऊसवर राहात असल्याने तुम्हाला माहीत नाही. लाचलुचपत विभागाने तपास केला असून कोणताही चुकीचा व्यवहार झालेला नाही. न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलेला असून कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचं सांगण्यात आलं आहे . अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
Eknath Khadse gave impromptu reply to people calling Watermelon
महत्त्वाच्या बातम्या
- लखीमपूर हिंसाचार : ‘प्रियांका, मला माहिती आहे मागे हटणार नाहीस!’, पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर राहुल गांधींचे ट्वीट
- वाचा सविस्तर… लखीमपूर हिंसाचाराचा आरोप असलेला केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा कोण? फॅमिली बिझनेस सांभाळतो, राजकारणात सक्रिय;
- लखीमपूर दुर्घटना : केंद्रीय मंत्र्यांचा मुलासह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल, 4 शेतकऱ्यांसह 8 जणांचा झाला होता मृत्यू
- Pandora Paper Leak : जाणून घ्या पेंडोरा पेपर्स लीक म्हणजे काय, भारतातील सचिन तेंडुलकर, अनिल अंबानींसह 300 हून अधिक जणांवर करचोरीचा ठपका
- AARYAN KHAN DRUGS CASE : Cruise Party मध्ये आर्यन खानने केलं होत ड्रग्सचं सेवन NCB